घरAssembly Session LiveAssembly Election Result : ...देशातली जनता काँग्रेसला हद्दपार करेल; मुख्यमंत्री शिंदेंना...

Assembly Election Result : …देशातली जनता काँग्रेसला हद्दपार करेल; मुख्यमंत्री शिंदेंना विश्वास

Subscribe

मुंबई : मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यांतील 675 विधानसभा जागांसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली असून आज (3 डिसेंबर) चार राज्यांतील 635 जागांवर मतमोजणी होत आहे. यापैकी मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगडमध्ये भाजपाचे सरकार येणार हे जवळपास निश्चित आहे. याचपार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विश्वास व्यक्त केला की, येणाऱ्या निवडणुकांमध्ये या देशातली जनता काँग्रेसला हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही. (Assembly Election Result people in the country will expel the Congress Faith in Chief Minister Eknath Shinde)

हेही वाचा – Assembly Election Result : चार राज्यांच्या निकालवर मुख्यमंत्री शिंदे म्हणतात…; ‘मन मन मोदी’

- Advertisement -

एकनाथ शिंदे म्हणाले की, काँग्रेसचे राहुल गांधी यांनी भारत जोड यात्रा केली. ते परदेशात जाऊन भारताची बदनामी करत होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची बदनामी परदेशात जाऊन करत होते. त्यामुळे लोकांनी त्यांना धडा शिकवला. त्यांना त्यांची जागा दाखवली आहे. कारण या देशामध्ये, या राज्यामध्ये देशावर प्रेम करणारे मतदार आहेत. गेल्या निवडणुकीमध्ये राजस्थानमध्ये राहुल गांधी यांनी गेल्या निवडणुकीमध्ये आश्वासन दिलं होतं की, शेतकऱ्यांना त्यांनी एक, दोन, तीन असे दहा वेळा मोजून दाखवून दहा दिवसांमध्ये शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू, परंतु पाच वर्षात त्यांनी त्याचं आश्वासन पाळलं नाही, असे तिथल्या मतदारांनी मला सांगितलं, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

कर्नाटकमध्येही राहुल गांधी खूप मोठी मोठी आश्वासनं देऊन जनतेला धोका देऊन निवडून आले. परंतु त्यांचेच उपमुख्यमंत्री आणि मंत्री निवडून आल्यानंतर कर्नाटकमध्ये सत्ता आल्यानंतर योजना पूर्ण करायला पैसे नाहीत, अशा प्रकारचा खुलासा सरकारने केला. परंतु जनता सुज्ञ आहे. या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टी, एनडीए आणि मोदींचा पूर्णपणे विजय झालेला आहे. मोदींच्या विचारांचा विजय झालेला आहे आणि येणाऱ्या निवडणुकांमध्ये या देशातली जनता काँग्रेसला हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

- Advertisement -

हेही वाचा – Post Results Effect : मतमोजणी सुरू असतानाच भाजपा अन् काँग्रेसकडून ‘रिसॉर्ट पॉलिटिक्स’ सुरू

एकनाथ शिंदे म्हणाले की, 2014 च्या लोकसभा निवडणुकीला विरोधकांनी खूप खालच्या पातळीवर मोदींवर आरोप केले. परंतु 2014 ला मोदी सत्तेत आले. 2019 ला इंडिया आघाडीवाले एकत्र आले होते. सर्व विरोधकांनी पुन्हा एकदा आरोप केले, परंतु मोदींनी या देशाचा विकास करणे, या देशातल्या जनतेला न्याय देणे या देशाची अर्थव्यवस्था सुधरवणे, या देशातील गोरगरीबांचे जीवन बदलण्यासाठी प्रयत्न केले. या देशामध्ये कुणीही उपाशी राहू नये, याची चिंता मोदींनी केली. त्यामुळे 2024 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये पूर्णपणे इंडिया आघाडीचं पानिपत होईल. 2024 ला आतापर्यंतचे सगळे रेकॉर्ड मोदी तोडतील आणि पुन्हा या देशाचे पंतप्रधान होतील, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -