घरदेश-विदेशअभ्यास न केल्याने आत्याने पकडीने उपटली भाचीची नखे

अभ्यास न केल्याने आत्याने पकडीने उपटली भाचीची नखे

Subscribe

अभ्यास न केल्याने आत्याने भाचीची पकडीने नखे उपटून काढल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी आते आणि तिच्या नवऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे.

मुले अभ्यास करत नाहीत म्हणून त्यांना सर्वोतोपरी समजावले जाते. त्यांना एखाद्या गोष्टीची भीती दाखवली जाते, तर त्यांच्यावर रागवले देखील जाते. मात्र तरीही मुले ऐकली नाहीत तर त्यांच्यावर रागावून त्यांना एखादा धपाटा देखील दिला जातो. मात्र बंगळुरुमध्ये चक्क सात वर्षाच्या मुलीने अभ्यास केला नाही म्हणून तिच्या आतेने त्याचिमुरडीची पकडीने नखे उपटली असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. याप्रकरणी आत्या आणि तिच्या नवऱ्याला पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे.

असे आले प्रकरण उघडकीस

चिमुरडीची बोट काळी निळी झाली होती. हे पाहून आजीने चिमुरडीची बोटे तपासली तर ही मुलगी आजीला बोटांना हात देखील लावायला देत नव्हती. तसेच ही चिमुरडी हातात पेन्सिलही धरत नव्हती. अखेर आजी नातीला घेऊन रुग्णालयामध्ये गेली. डॉक्टरांनी चिमुरडीची बोट पाहिली असता ती साधी जखम नसून मोठी जखम झाल्याचे डॉक्टरांनी चिमुरडीच्या आजीला सांगितले. त्यांनी चिमुरडीकडे विचारणा केली असता त्या चिमुरडीने तिच्या बाबतीतील घडलेला प्रकार सांगितला.

- Advertisement -

आत्या माझा अभ्यास घेत असते. मात्र मी अभ्यास नाही केला तर मला मारहाण देखील करते. मी त्या दिवशी अभ्यास करुन देखील आतेने मला मारहाण करुन माझ्या बोटाची पकडीने नखे उपटून काढली. या घटनेची माहिती चिमुरडीने डक्टरांना दिली. डॉक्टरांनी देखील घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिसांनी घडलेल्या प्रकाराची चौकशी करुन आते आणि तिच्या नवऱ्यावर बाल अत्याचार कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करुन दोघांना ही अटक केली आहे.

चिमुरडी आतेकडे राहायची

या चिमुरडीच्या आईचा काही महिन्यांपूर्वीच मृत्यू झाला होता. तर वडील कामानिमित्त दुसऱ्या जिल्ह्यात राहत असल्याने त्यांनी आपल्या मुलीला आतेकडे ठेवले होते. आते या चिमुरडीला शाळेत घेऊन जाणे, तिचा अभ्यास करुन घेणे सर्व करायची मात्र अभ्यास नाही केला तर तिला मारहाण देखील करायची. मुलीच्या अभ्यासासाठी आत्या तिला मारहाण करत असल्याने आजी देखील काही बोलत नव्हती. मात्र याचाच गैरफायदा घेऊन आत्याने मागचा पुढचा विचार नकरता पकडीने चिमुरडीची नखे उपटून काढली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -