घरनवरात्रौत्सव 2022नवरात्रौत्सवातील घटस्थापना!

नवरात्रौत्सवातील घटस्थापना!

Subscribe

नवरात्रौत्साव घटस्थापनेचा दिवसही महत्त्वाचा आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते.

नवरात्रौत्सावाला उद्या, बुधवारपासून सुरुवात होत आहे. जगभरात प्रामुख्याने महाराष्ट्र, गुजरात, राजस्थानमध्ये हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. नऊ दिवसांच्या या उत्सवात घरोघरी घटस्थापना, सोसायटी आणि मोठमोठ्या मैदानांवर दांडिया आणि मंडळांमध्ये देवीची प्रतिष्ठापना यांची रेलचेल आपल्याला पाहायला मिळणार आहे. नवरात्रौत्साव घटस्थापनेचा दिवसही महत्त्वाचा आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. येथे जाणून घ्या, देवीची घटस्थापना विधी आणि शुभ मुहूर्त…
  • घटस्थापनेसाठी लागणारे पूजेचे साहित्य 

नवरात्रोत्सवात शेतातील काळी माती, एक पत्रावळ, पाच प्रकारचे धान्य यामध्ये गहू, साळी, इतर कडधान्य इ., कुंभ कलश, विड्याची पाने, सुपारी, छोटी नाणी, कलशाला बांधण्यासाठी दोरा, धूप-दीप, गुगुळ, कुंकू, हळद, अक्षता, गुलाल इत्यादी पूजेचे साहित्य घेणे आवश्यक आहेत.
  • विधीवत घटाची स्थापना करावी

अमावस्येच्या दिवशी सर्व पूजासामग्री जमवावी. एकाच वेळी भोजन करावे. घटस्थापनेसाठी स्वच्छ जागेची निवड करावी. प्रतिपदेला सकाळी लवकर उठून नदी, तलाव, विहीर किंवा सोईस्कर ठिकाणी स्नान करावे. चौरंग किंवा पाटावर देवीची प्रतिमा स्थापन करून रत्नभूषण, मुक्ताहराने सुशोभित करावी. फोटो नसल्यास दुर्गायंत्राची स्थापना करावी. त्यासमोर पवित्र ठिकाणची किंवा शेतातील माती आणून वेदी (वेदी म्हणजे शेत) तयार करून त्यामध्ये पाच प्रकारचे धान्य पेरावेत. पीठ पूजेकरिता चौरंगाच्या दक्षिणेला कलश ठेवावा. त्यामध्ये तीर्थ-जल ठेवावे. एखादे रत्न किंवा सुवर्णही त्यात ठेवावे.

  • घटस्थापनेचे महत्त्व

पूजा झाल्यानंतर देवीसमोर गायन-वादन करावं. विधीवत मंत्रोच्चाराबरोबर पूजन करावे. उत्सवात जमिनीवर झोपावे. कुमारिकांचे पूजन करावे. एक किंवा दोन वर्षाची कन्या कुमारिका, तीन वर्षांची कालिका, सात वर्षांची चंडिका, आठ वर्षांची शांभवी, नऊ वर्षांची दुर्गा आणि दहा वर्षांची सुभद्रा मानली जाते. दहा वर्षापुढील कन्येला पूजनासाठी वर्ज्य मानले आहे. नऊ दिवस उपवास करणे शक्य नसल्यास तीन दिवस उपवास करावा. भक्तिभावाने सप्तमी, अष्टमी आणि नवमीच्या रात्री भगवती पूजन केल्याने सर्व चांगले फळ मिळतात. (ही माहिती श्रीदेवी भागवत पुराण पुस्तकातून घेण्यात आली आहे.)

- Advertisement -

घटस्थापनेचा शुभमुहूर्त 

१० ऑक्टोबर २०१८ रोजी, अश्विन शु.  प्रतिपदा समाप्ती सकाळी ७.२५ वाजता होणार आहे. सूर्योदयानंतर एक मुहूर्तापेक्षा जास्त म्हणजे ४८ मिनिटे प्रतिपदा असते. तेव्हा प्रतिपदेच्या दिवशी घटस्थापना करावी, असे म्हटले जाते. ज्या गावी ६.३८ वाजता सूर्योदय आहे, त्या गावी बुधवारी सूर्योदयानंतर एक मुहूर्तापेक्षा कमी प्रतिपदा असल्याने अशा प्रदेशात ९ ऑक्टोबर २०१८ रोजी अमावस्या संपल्यानंतर नवरात्रारंभ, घटस्थापना करावी.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -