घरताज्या घडामोडीहवाई प्रवासही महागणार! विमानाचे इंधन लीटरमागे २०४० रुपयांनी कडाडले

हवाई प्रवासही महागणार! विमानाचे इंधन लीटरमागे २०४० रुपयांनी कडाडले

Subscribe

डिसेंबरमध्ये विमान इंधनाच्या किंमतीमध्ये दोन वेळा कपात केली होती. नोव्हेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात आणि डिसेंबर मध्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर तेलाच्या किंमतीत घसरण झाल्यामुळे एटीएफचे दर कमी झाले होते.

आता हवाई प्रवास करणे महाग होऊ शकते. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमती दरम्यान विमान इंधन म्हणजेच एटीएफच्या (Aviation Turbine Fuel) किंमती २.७५ टक्क्यांनी वाढल्या आहेत. पण कमर्शियल (व्यावसायिक) वापराचे गॅस सिलेंडरच्या (LPG) किंमतीत १०२.५ रुपये प्रति सिलेंडर कपात करण्यात आली आहे.

सरकारी पेट्रोलियम कंपन्यांच्या माहितीनुसार, दिल्लीत एटीएफची किंमत २,०३९.६३ रुपये प्रति किलोलीटर वाढवून ७६,०६२.०४ रुपये प्रति किलोलीटर केली आहे. यापूर्वी डिसेंबरमध्ये विमान इंधनाच्या किंमतीमध्ये दोन वेळा कपात केली होती. नोव्हेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात आणि डिसेंबर मध्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर तेलाच्या किंमतीत घसरण झाल्यामुळे एटीएफचे दर कमी झाले होते.

- Advertisement -

त्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किंमती वाढू लागल्या. नोव्हेंबरच्या मध्यात एटीएफची किंमत ८०,८३५.०४ रुपये प्रति किलोमीटर उच्चांकी पोहोचले होते. त्यानंतर पुन्हा १५ डिसेंबरला एटीएफची किंमत एकूण मिळून ६,८१२.२५ रुपये प्रति किलोमीटर म्हणजेच ८.४ टक्क्यांनी घटली होती.

दरम्यान कमर्शियल वापरणारे १९ किलोग्रॅम एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत १०२.५ रुपयांनी कपात करण्यात आली आहे. या सिलेंडरचा वापर हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये केला जातो. ही एलपीजीची किंमत ६ ऑक्टोबर २०२१ नंतर पहिल्यात कपात झाली आहे. १ डिसेंबर २०२१ रोजी एलपीजी सिलेंडरचे दर १,७३४ रुपयांहून २,१०१ रुपये प्रति सिलेंडर झाले होते.

- Advertisement -

तसेच एलपीजी वापरणाऱ्या १४.२ किलोग्रॅम सिलेंडरच्या किंमतीत आता कोणताही बदल झाला नाही. यामुळे सिलेंडरची किंमत ८९९.५० रुपये कायम राहिली आहे.


हेही वाचा – Covid-19 Restrictions: पश्चिम बंगालमध्ये कडक निर्बंध लागू; शाळा, कॉलेज, पार्लर, जिम सर्वकाही बंद


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -