घरताज्या घडामोडीनव्या वर्षात राजकीय रणधुमाळी ! राज्यसभा, विधान परिषदेसह महापालिका, ZP निवडणूका रंगणार

नव्या वर्षात राजकीय रणधुमाळी ! राज्यसभा, विधान परिषदेसह महापालिका, ZP निवडणूका रंगणार

Subscribe

नव्या २०२२ या वर्षात राज्यसभा, विधानपरिषदेसह  राज्यातील महापालिका, नगरपालिका, नगर पंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी निवडणूक अपेक्षित आहे. त्यामुळे नवे वर्ष राजकीय रणधुमाळीचे ठरणार असून या वर्षात महाविकास आघाडी विरुद्ध भाजप आणि मित्र पक्ष असा सामना रंगणार आहे.

महाविकास आघाडीने तिसऱ्या वर्षात पदार्पण केले आहे. परिणामी स्थानिक निवडणुकीत सरकारच्या दोन वर्षांच्या कारभाराबद्दल जनतेचा कौल आघाडीसाठी महत्वाचा ठरणार आहे. तर २०२४ ची विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राजकीय पक्षांना मोर्चेबांधणी, युती अथवा आघाडीसाठी हे वर्ष निर्णायक ठरणार आहे.

- Advertisement -

महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून गेलेल्या सहा खासदारांची मुदत या  वर्षीच्या उत्तरार्धात म्हणजे जुलै महिन्यात संपत आहे. त्यात केंद्रीय मंत्री पियुष गोयल, शिवसेना खासदार संजय राऊत यांचा समावेश आहे. आघाडी आणि भाजपसाठी राज्यसभेची निवडणूक प्रतिष्ठेची असणार आहे.

याशिवाय वर्षभरात स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून द्यायच्या सात जागांसाठी निवडणूक  होणार आहे. या निवडणुकीतही आघाडी विरुद्ध भाजप अशी लढत होण्याची चिन्हे आहेत. तसेच महाराष्ट्र विधानसभा सदस्यांच्या मतदानाद्वारे विधान परिषदेवर निवडून गेलेल्या नऊ सदस्यांची मुदत जुलै २०२२ मध्ये संपत आहे. त्यात उद्योग मंत्री सुभाष देसाई, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचा समावेश आहे.

- Advertisement -

मुंबई, ठाणे, उल्हासनगर, नाशिकसह १० महापालिकांची मुदत येत्या तीन महिन्यात संपत आहे. त्यामुळे या १० महापालिकांसह अन्य १३ अशा एकूण २३ महापालिका, २७ जिल्हा परिषदा, त्या अंतर्गत  ३०९ पंचायत समित्या आणि नगरपालिकांच्या निवडणुका  होणार आहेत. त्यामुळे राज्यात  वर्षभर राजकीय वातावरण तापलेले असणार आहे.

४ जुलै २०२२ रोजी निवृत्त होणारे राज्यसभा सदस्य

भाजप : पियुष गोयल, विनय सहस्त्रबुद्धे, डॉ. विकास महात्मे
शिवसेना : संजय राऊत
काँग्रेस : पी. चिदंबरम
राष्ट्रवादी काँग्रेस : प्रफुल्ल पटेल

विधानपरिषदेचा कार्यकाळ पूर्ण करणारे सदस्य

भाजप : प्रवीण दरेकर, सदाभाऊ खोत, सुजितसिंह ठाकूर, प्रसाद लाड, विनायक मेटे, रामनिवास सत्यनारायण सिंह
शिवसेना: सुभाष देसाई, दिवाकर रावते
राष्ट्रवादी काँग्रेस : संजय दौंड

स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचे विधान परिषदेत प्रतिनिधित्व करणारे आणि यावर्षी मुदत संपणारे  सदस्य

शिवसेना : रवींद्र फाटक (ठाणे),  दुष्यंत चतुर्वेदी (यवतमाळ)

भाजप : चंदूभाई पटेल (जळगाव), परिणय फुके (भंडारा -गोंदिया)

काँग्रेस : मोहनराव कदम (सांगली सातारा )
अमरनाथ राजूरकर (नांदेड)

राष्ट्रवादी काँग्रेस : अनिल भोसले (पुणे)

यावर्षी मुदत संपणाऱ्या महापालिका

मुंबई, ठाणे, उल्हासनगर, नाशिक, पुणे,पिंपरी- चिंचवड, सोलापूर, अकोला अमरावती, नागपूर,परभणी, चंद्रपूर, लातूर,चंद्रपूर, भिवंडी-निजामपूर, मालेगाव, पनवेल, मीरा-भाईंदर

मुदत संपलेल्या आणि निवडणुकीच्या प्रतीक्षेतील महापालिका

कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, वसई-विरार, औरंगाबाद, कोल्हापूर

निवडणूक होऊ घातलेल्या जिल्हा परिषदा

ठाणे, रायगड, नाशिक, अहमदनगर, जळगाव, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -