Covid-19 Restrictions: पश्चिम बंगालमध्ये कडक निर्बंध लागू; शाळा, कॉलेज, पार्लर, जिम सर्वकाही बंद

west bengal government strict on corona rules few protocols will be followed till 15 january
Covid-19 Restrictions: पश्चिम बंगालमध्ये कडक निर्बंध लागू; शाळा, कॉलेज, पार्लर, जिम सर्वकाही बंद

पश्चिम बंगालमध्ये ओमिक्रॉनच्या वाढत्या रुग्णांमुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. आता पश्चिम बंगालच्या सरकारने वाढत्या कोरोनाबाधितांच्या अनुषंगाने कडक निर्बंध लागू केले आहेत. पश्चिम बंगाल सरकारने सर्व शैक्षणिक संस्था बंद करण्याची घोषणा केली आहे. तसेच कार्यालय ५० टक्के क्षमतेने उघडण्यास सरकारने परवानगी दिली आहे. केवळ अत्यावश्यक सेवा राज्यात सुरू राहणार आहे. शाळा, कॉलेज, स्पा, सलून, ब्यूटी पार्लर, गार्डन, जिम, प्राणीसंग्रहालय सर्वकाही बंद ठेवण्याचा निर्णय पश्चिम बंगाल सरकारने घेतला आहे. यासंबंधीत नव्या मार्गदर्शक सूचना जारी आल्या आहेत. उद्यापासून ते १५ जानेवारीपर्यंत कडक निर्बंध पश्चिम बंगालमध्ये लागू करण्यात आले आहेत.

पश्चिम बंगालमध्ये १५ जानेवारीपर्यंत कोणते कडक निर्बंध लागू?

 • शाळा, कॉलेज आणि सर्व शैक्षणिक उपक्रम बंद
 • ५० टक्के कर्मचाऱ्यांसह प्रशासकीय कामांना परवानगी
 • ५० टक्के क्षमतेने सर्व सार्वजनिक क्षेत्रासह सरकारी कार्यालय उघडण्याची परवानगी. वर्क फ्रॉम होम करण्याचा सल्ला
 • सर्व खासगी कार्यालये आणि आस्थापनांना ५० टक्के कर्मचाऱ्यांसह काम करण्याची परवानगी
 • स्विमिंग पूल, स्पा, जिम, ब्यूटी पार्लर, सलून बंद
 • सर्व गार्डन, प्राणीसंग्रहालय, पर्यटन स्थळ बंद
 • रेस्टॉरंट आणि बार ५० टक्के क्षमतेने रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी
 • चित्रपटगृह आणि नाट्यगृह ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवण्याची परवानगी
 • बैठक आणि संमेलनात एकाच वेळी २०० लोकांना उपस्थितीत राहण्याची मुभा
 • कोणत्याही सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमात एकाच वेळी ५० हून अधिक लोकांना उपस्थितीत राहण्याची परवानगी नाही
 • लग्नसोहळ्याला ५० हून अधिक लोकांना उपस्थितीत राहण्याची परवानगी नाही
 • अंत्यसंस्कारासाठी फक्त २० लोकांना उपस्थितीत राहण्याची परवानगी
 • लोकल ट्रेन ५० टक्के क्षमतेने संध्याकाळी ७ वाजेपर्यंत सुरू राहणार
 • मेट्रो सेवा सामान्य कामकाजाच्या तासांनुसार ५० टक्के आसन क्षमतेसह चालतील
 • रात्री १० ते सकाळी ५ वाजेपर्यंत लोकं, वाहने आणि कोणत्याही प्रकारच्या सार्वजनिक मेळाव्यावर बंदी. फक्त अत्यावश्यक सेवांना परवानगी.

हेही वाचा – Lockdown : ..तर येत्या काळात पुन्हा काही सेवांवर कडक निर्बंध लागतील, राजेश टोपेंचा इशारा