घरदेश-विदेशअयोध्येत तयार होणाऱ्या बाबरी मशिदीचं डिझाईन प्रसिद्ध

अयोध्येत तयार होणाऱ्या बाबरी मशिदीचं डिझाईन प्रसिद्ध

Subscribe

पाच एकर जागेवर उभारण्यात येणार मशीद

इंडो-इस्लामिक कल्चरल फाऊंडेशन ट्रस्टने शनिवारी अयोध्येतील धन्नीपूर गावात उभारण्यात येणाऱ्या मशिदीचे डिझाईन प्रसिद्ध केल आहे. अयोध्येपासून ३० किमी अंतरावर असलेल्या या गावात मशिदीसाठी ५ एकर जागा देण्यात आलेली आहे. मशिदीचे भव्यदिव्य डिझाईन फाऊंडेशनकडून प्रसिद्ध करण्यात आले असून, मशिदीबरोबरच रुग्णालय, सार्वजनिक भोजनालय आणि आधुनिक पुस्तकालय ही उभारण्यात येणार आहे.

- Advertisement -

शनिवारी धन्नीपूर येथे प्रस्तावित मशिदीच्या डिझाईन संदर्भात एक बैठक पार पडली. या बैठकीत फाऊंडेशनच्या सर्व सदस्यांसह आर्किटेक्ट्स देखील सहभागी झाले होते. मात्र ज्यांना बैठकीस उपस्थित राहता आले नाही त्यांना व्हर्च्युअल पद्धतीने जोडले गेले. बैठकीत मशीद बांधकाम, रूग्णालय, संशोधन केंद्र, कम्युनिटी किचन आणि संग्रहालय आदींच्या डिझाइनलाही मान्यता देण्यात आली.

- Advertisement -

इंडो-इस्लामिक कल्चरल फाऊंडेशन ट्रस्टने दिलेल्या माहितीनुसार, जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाच्या आर्किटेक्ट विभागातील (स्थापत्य कला) प्रा. एस. एम. अख्तर यांनी मशिदीचे डिझाईन तयार केले आहे. तयार करण्यात आलेल्या आरेखनाला संबंधित विभागाकडून वेळेत आवश्यक परवानग्या मिळाल्या, तर २६ जानेवारीपासून काम सुरू होण्याची शक्यता आहे. यासह  इंडो-इस्लामिक कल्चरल फाऊंडेशनचे (IICF) सचिव अथर हुसैन यांच्या मते, ५ एकर जागेच्या मध्यभागी ३०० बेडचे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल असेल. याशिवाय बांधल्या जात असलेल्या मशिदीत दोन हजार लोक एकत्र नमाज पठण करू शकतात. मशिदीचा आकार गोलाकार असणार आहे.

 

अयोध्याच्या सोहावल तहसीलच्या धन्नीपुर गावात राज्य सरकारने मशीदीसाठी पाच एकर जागा दिली आहे. अख्तर म्हणाले की, बाबरी मशिदीपेक्षा ही नवीन मशिदी मोठी असून रचना देखील वेगळी असणार आहे. मशिदीच्या आवरात मध्यभागी एक रुग्णालय असणार आहे. तर पैगंबरांनी १४०० वर्षांपूर्वी शिकवलेल्या शिकवणीप्रमाणेच मानवतेची सेवाही येथे केली जाईल. ते म्हणाले की, रुग्णालय केवळ रचनाच नसणार आहे तर मशिदीच्या वास्तूनुसार ते बांधले जाईल. यात ३०० खाटांचे खास युनिट असेल जेथे विनामूल्य उपचार होतील. यासह मशिदीचे बांधकाम अशा प्रकारे केले जाईल की त्यामध्ये सौरऊर्जेचीही व्यवस्था केली जाईल.


प्रजासत्ताक दिनी नव्या बाबरी मशीदीची पायाभरणी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -