घरताज्या घडामोडीLive Updates: देशात गेल्या २४ तासात २६,६२४ नव्या कोरोनाबाधितांची नोंद

Live Updates: देशात गेल्या २४ तासात २६,६२४ नव्या कोरोनाबाधितांची नोंद

Subscribe

नवीन वर्षाचं स्वागत करताना सावध राहा – मुख्यमंत्री


महाराष्ट्रात रात्रीची संचारबंदी लावण्याची गरज नाही- मुख्यमंत्री

- Advertisement -

जनतेने कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन केल्याने कोरोना परिस्थितीवर नियंत्रण – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे


पूर्ण नाही पण काही प्रमाणात कोरोना संसर्गाला अटकाव – मुख्यमंत्री

- Advertisement -

किमान पुढचं ६ महिने मास्क लावणं बंधणकारक – मुख्यमंत्री


युरोपातील देशांमध्ये चौथ्या टप्प्यातील कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. युरोपात कोरोनानं रुप बदललंय, कोरोना विषाणूचा संसर्गाचा वेग वाढला, युरोपातील परिस्थितीवरुन शिकलं पाहिजे, परदेशातून येणाऱ्यांच्या टेस्ट थांबवण्यात येणार नाहीत – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे


शिर्डीमध्ये साई मंदिरात दर्शनासाठी नवी व्यवस्था करण्यात आली आहे. आता दिवसाला १५ हजार भाविकांना दर्शन घेणं शक्य होणार आहे. सुट्ट्या आणि वीकेंडमुळे होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या आधी दिवसाला फक्त सहा हजार भाविकांना दर्शन घेण्याची परवानगी होती.


बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने गेल्या १४ जूनला कथितरित्या आत्महत्या केली. सुशांतच्या मृत्यूला ६ महिन्यांपेक्षा अधिक काळ उलटला. पण अद्यापही चाहते त्याला विसरले नाहीत. सुशांतच्या मृत्यूनंतर त्याचे वडिल के. के. सिंग यांनी आपल्या मुलाला न्याय मिळवून देण्यासाठी बरेच प्रयत्न केले होते. पण सध्या ते रूग्णालयात भरती आहेत. अलीकडे त्यांची प्रकृती अचानक बिघडली, यानंतर त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. बॉलिवूड लाईफने दिलेल्या वृत्तानुसार, हृदयाशी संबंधित आजारामुळे त्यांना रूग्णालयात भरती करण्यात आले. रुग्णालयातला त्यांचा एक फोटो सध्या व्हायरल होत आहे.


देशात गेल्या २४ तासात २६,६२४ नव्या कोरोनाबाधितांची नोंद

देशात गेल्या २४ तासात २६ हजार ६२४ कोरोनाचे नवे रूग्ण सापडल्याने हा आकडा वाढून १,००,३१,२२३ वर पोहोचला आहे. तर दिवसभरात ३४१ जणांचा कोरोनाने निधन झाले आहेत. तर दिलासादायक म्हणजे २९ हजारांहून अधिकांनी कोरोनावर मात केली आहे.


राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी नागपूर येथील निवासस्थानी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी राष्ट्रीय प्रवक्ते आणि जेष्ठ नेते मा. गो. वैद्य यांना अंतिम श्रद्धांजली वाहिली. शनिवारी वयाच्या ९७ व्या वर्षी वैद्य यांचे निधन झाले. त्यांचे जीवन आरएसएसचे विश्वकोश होते, असे भागवत म्हणाले.


मराठा क्रांती मोर्चाची येत्या रविवारी आज २० डिसेंबर रोजी मुंबईत राज्यव्यापी बैठक आयोजित करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे व निष्क्रियतेमुळे मराठा आरक्षणावर स्थगिती आली. आरक्षणावर स्थगिती आल्यावर मराठा समाजात असंतोषाचा भडका उडाला. परंतु या असंतोषाची दखल घेण्याची तसदी पण राज्य सरकारने घेतली नाही. या अरकरच्या उदासीन भूमिकेवर विचार करणे आणि पुढील दिशा निश्चिती करण्यासाठी मुंबईत या राज्यव्यापी बैठकीचे आयोजन मराठा क्रांती मोर्चामार्फत केले आहे.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुपारी एक वाजता महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधणार आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून मुख्यमंत्री जनतेला संबोधित करणार आहेत. कोरोना आणि नववर्षाचं स्वागत यासोबतच नाताळ यासंदर्भात मुख्यमंत्री जनतेशी संवाद साधणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


घाटकोपर मानखुर्द लिंक रोडवर काल मध्यरात्री एका उभ्या असलेल्या मोटार कारला भीषण आग लागली.आगीची माहिती काही चालकांनी अग्निशमन दल आणि पोलिसांना देताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. काही वेळातच अग्निशमन दलाने ही आग पूर्णपर्ण विझवली. गाडी रस्त्याच्या कडेला पार्किंग केलेली असल्याने त्यात कोणीही उपस्थित नव्हते यामुळे कोणी जखमी झाले नसले तरी आगीत गाडी पूर्णपणे खाक झाली. ही गाडी नक्की कोणाची होती, आग कशी लागली याचा तपास पोलीस करीत आहेत.


महाराष्ट्र व मध्यप्रदेश सीमेलगत असलेल्या अमरावती जिल्ह्यातील चांदुर बाजार तालुक्यात गांजाची मोठी तस्करी होत असल्याचं स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईने उघड झालं. दोन्ही राज्याच्या सीमेलगत असलेल्या चांदुर बाजार तालुक्यात गांजाची मोठी तस्करी होत होती. स्थानिक गुन्हे शाखेला माहिती मिळताच स्थानिक पोलिसांच्या मदतीने सापळा रचून दोन दुचाकीवर ५ युवक गांजाची तस्करी करत असताना आढळले. पोलिसांनी तपासणी केली असता त्यामध्ये अंदाजे ४६ किलो गांजा जप्त करण्यात आला

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -