घरदेश-विदेशBan Cigarette : तरुणांना आयुष्यभर सिगारेट खरेदी करता येणार नाही; न्यूझीलंड सरकारचा...

Ban Cigarette : तरुणांना आयुष्यभर सिगारेट खरेदी करता येणार नाही; न्यूझीलंड सरकारचा निर्णय

Subscribe

देशाचे भविष्य धुम्रपानाच्या व्यसनापासून वाचवण्यासाठी न्यूझीलंड सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. १४ किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या तरुणांच्या सिगारेट खरेदीवर आयुष्याभरासाठी बंदी घालण्यासाठी न्यूझीलंड सरकारने नवा कायदा आणला आहे. हा कायदा पुढील वर्षांपर्यंत लागू होण्याची शक्यता आहे. याशिवाय सिगारेट खरेदीसाठी कमीतकमी वयोमर्यादा देखील प्रत्येक वर्षी वाढवली जाईल.

सरकराच्या मते, हा कायदा लागू झाल्यानंतर ६५ वर्षानंतर दुकानदार फक्त ८० वर्ष किंवा त्याहून अधिक वय असलेल्यांना सिगारेट विकू शकतील. २०२५ पर्यंत देशात धुम्रपान करणाऱ्यांची संख्या पाच टक्क्यांनी कमी करण्याचे सरकारचे लक्ष्य आहे. सरकारने असेही सांगितले की, धुम्रपान कमी करण्यासाठी इतर प्रयत्नांसाठी अधिक वेळ लागतोय. यातून तंबाखूजन्य उत्पादनांमधील निकोटीनचे प्रमाण करण्याचे उद्दिष्ट आहे. देशात दरवर्षी जवळपास पाच हजार लोकांचा धूम्रपानामुळे मृत्यू होतोय.

- Advertisement -

न्यूझीलंडच्या सहयोगी आरोग्यमंत्री आयशा वेरॉल यांनी निवेदनात म्हटले की, देशातील तरुणांनी धुम्रपान करुन नये हे आम्ही सुनिश्चित करतोय. त्यामुळे तरुण वर्गाला तंबाखूजन्य पदार्थ विक्री किंवा पुरवठा करणे हा गुन्हा ठरणार आहे. येथील सरकारच्या मते, गेल्या दशकात धूम्रपानाच्या प्रमाणात घट झाली आहे. सध्या न्यूझीलंडमध्ये १८ वर्षांखालील तरुणांना तंबाखूजन्य पदार्थ्यांची विक्री करण्यावर पूर्णपणे बंदी आहे.

काही बदलले नाही तरी, देशात धुम्रपानाचे प्रमाण ५ टक्क्यांनी कमी होण्यासाठी अनेक दशके लागतील. सरकारी आकडेवारीनुसार, सध्या न्युझीलंडमध्ये १५ वर्षांवरील ११.६ टक्के लोक धूम्रपान करतात. २०२२ च्या अखेरीस धुम्रपानासंबंधित कायदा तयार करण्याचा प्रस्ताव सरकार पुढील वर्षात जूनमध्ये संसदेत मांडण्यात येणार आहे.


माझ्या दादाकडे पाहिलं तर… महापौर किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याचे धमकीचे पत्र


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -