घरदेश-विदेशभारतीय शहीद जवानांच्या स्मरणार्थ बांगलादेशामध्ये संग्रहालय

भारतीय शहीद जवानांच्या स्मरणार्थ बांगलादेशामध्ये संग्रहालय

Subscribe

४७ वा शहीद दिन साजरा करत असताना शहीद सैनिकांच्या नातेवाईकांना मुक्ती जुधो पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. १२ जवान यामध्ये शहीद झाले होते.

१९७१ साली भारत- पाकिस्तान युद्ध झाले. यात पाकिस्तान हरला आणि बांगलादेश एक नवा देश म्हणून स्वतंत्र झाले. या युद्धात शहीद १२ भारतीय जवानांनी प्राणाची आहुती दिली. या जवानांच्या कुटुंबियांचा सत्कार रविवारी बांगलादेश सरकारकडून करण्यात आला. शहीद दिनाच्या निमित्ताने बांगलादेशमध्ये हा सोहळा पार पडला. यावेळी बांगलादेश सरकारने या सैनिकांच्या पराक्रमाची गाथा लोकांच्या कायम लक्षात राहावी यासाठी संग्रहालय बांधण्याचा निर्णय घेतला आहे. हे संग्रहालय भारतीय सैनिकांना समर्पित करण्यात येणार आहे.

‘मुक्ती जुधो’ पुरस्काराने सन्मान

४७ वा शहीद दिन साजरा करत असताना शहीद सैनिकांच्या नातेवाईकांना मुक्ती जुधो पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. १२ जवान यामध्ये शहीद झाले होते. यात १० आर्म फोर्स आणि २ एअर फोर्सचे जवान होते. शहीद दिनाच्या निमित्ताने शहीद जवानांच्या कुटुंबांना या कुटुंबाचे आभार मानत या संग्रहालयाची घोषणा करण्यात आली.

- Advertisement -

२०१९मध्ये बांधणार संग्रहालय

चित्तोगाँग येथील ब्रम्हानबरिया येथे हे संग्रहालय उभारण्यात येणार असून पुढील वर्षी मे- जून महिन्यापर्यंत याचे बांधकाम पूर्ण होईल असे एकेएम मुझामेल हक यांनी सांगितले आहे. या संग्रहालयामुळे या ठिकाणाला एक वेगळीच ओळख मिळणार असल्याचेदेखील त्यांनी सांगितले आहे.

ही शहीदांना मानवंदना

शहिदांमुळे बांगलादेशला स्वतंत्र ओळख  मिळाली असून ही शहिदांसाठी बांधलेले संग्रहालय त्यांना वाहिलेली श्रद्धांजली आहे.शिवाय त्यांचे कार्य इतके महान आहे की, त्यांच्या पराक्रमाची आठवण अशा प्रकारे ठेवणे ही शहीदांना मानवंदना आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -