घरमहाराष्ट्रसाताऱ्यात तीन अपघातात २ ठार; १२ जखमी

साताऱ्यात तीन अपघातात २ ठार; १२ जखमी

Subscribe

साताऱ्यातील आशियाई महामार्ग ४७ वरील खंडाळा तालुक्यात विविध ठिकाणी झालेल्या तीन अपघातात २ जण ठार तर १२ जण जखमी झाले आहेत.

साताऱ्यातील आशियाई महामार्ग ४७ वरील खंडाळा तालुक्यात विविध ठिकाणी झालेल्या तीन अपघातात २ जण ठार तर १२ जण जखमी झाले आहेत. ठार झालेले दोघेही पादचारी आहेत. घटनास्थळावरून तसेच पोलिसांनी दिलेली माहितीनुसार, मुंबईहून जावळी तालुक्यातील मेढा याठिकाणी निघालेली मिनी बस (एमएच ११ सीएच १६३४) ही पारगाव हद्दीमध्ये असणाऱ्या एका गॅरेजसमोर आली असता बसचालकाचे नियंत्रण सुटून महामार्गालगत उसाने भरलेल्या नंबर नसलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला पाठीमागून धडकली. ही धडक एवढी जोरदार होती की मिनी बसमधील २३ पैकी १२ प्रवासी जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच खंडाळा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत स्थानिकांच्या मदतीने जखमींना खंडाळा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

खंडाळा पोलीस स्टेशनला तक्रार 

याबाबतची फिर्याद ज्ञानेश्वर अशोक धनावडे यांनी खंडाळा पोलीस स्टेशनला दिली आहे. त्याचप्रमाणे शिरवळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत केसुर्डी ता. खंडाळा गावच्या हद्दीत एका मंदिरासमोर अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत महामार्ग ओलांडणारे पाडळी, ता. खंडाळा येथील अरुण वाघमारे (वय ५५) हे डोक्याला गंभीर दुखापत होऊन जागीच ठार झाले.

- Advertisement -

वाहनाच्या धडकेत अज्ञात जागीच ठार

शिरवळ हद्दीत एका कृषी मॉलसमोर अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत अज्ञात पुरुष जातीचे (वय ३५) हे डोक्यावरून चाक गेल्याने जागीच ठार झाले. या अपघातांची नोंद शिरवळ पोलीस स्टेशनला झाली असून पोलीस हवालदार किशोर नलावडे, स्वप्नील दौंड तपास करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -