घरदेश-विदेशलिपस्टिक अन् बॉबकट महिला आरक्षण विधेयकामुळे...; RJD नेत्याचे आक्षेपार्ह विधान, भाजपाचे प्रत्युत्तर

लिपस्टिक अन् बॉबकट महिला आरक्षण विधेयकामुळे…; RJD नेत्याचे आक्षेपार्ह विधान, भाजपाचे प्रत्युत्तर

Subscribe

नवी दिल्ली : संसदेच्या विशेष अधिवेशनात महिला आरक्षण विधेयक मंजूर करण्यात आलं आहे. हे विधेयक लागू कधी होणार याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. परंतु महिला आरक्षण विधेयकाच्या नावाने लिपस्टिक आणि बॉबकट हेअरस्टाइल असलेल्या महिला पुढे येतील, असे आक्षेपार्ह विधान करून राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) ज्येष्ठ नेते अब्दुल बारी सिद्दीकी (Abdul Bari Siddiqui) वादात सापडले आहेत. यानंतर त्यांनी त्यांच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. (Because of the lipstick and bobcut womens reservation bill RJD leaders offensive statement BJPs response)

आपला पक्ष सुरुवातीपासूनच महिला विधेयकाला पाठिंबा देत असल्याचे सांगत अब्दुल बारी सिद्दीकी यांनी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी असेही म्हटले की, महिला आरक्षण विधेयकाचा सर्वात मोठा समर्थक आमचा पक्ष आहे. जो ओबीसी महिलांचा समावेश करण्यासाठी कोट्यामध्ये आरक्षणाची मागणी करत आहे. आमच्या रॅलीमध्ये अनेक ग्रामस्थ महिलांचा समावेश होता. नवीन कायद्याचे फायदे समजावून सांगण्यासाठी सोप्या ग्रामीण भाषेचा आम्ही वापर केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Rs 2000 Notes : RBI कडून 2 हजार रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी मुदत वाढ

भाजपाचे जोरदार प्रत्युत्तर

अब्दुल बारी सिद्दीकी यांच्या वक्तव्याचे वर्णन केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते कौशल किशोर यांनी आरजेडी नेत्याच्या “लहान मानसिकतेचे” लक्षण असल्याचे म्हटले आहे. ज्या महिला निवडून आल्यावर संसदेत येत आहेत, त्या संविधान आणि कायदे वाचून लोकहिताबाबत बोलत आहेत. ज्याप्रमाणे गाडीला दोन चाके असतात, त्याचप्रमाणे संसद आणि विधानसभेतील महिला आणि पुरुष मिळून लोकहिताचे कायदे करतील आणि विकसित भारत घडवण्यास मदत करतील, असा विश्वास कौशल किशोर यांनी व्यक्त केला.

- Advertisement -

हेही वाचा – भारतातील ‘या’ दिग्गज आयटी कंपनीने बंद केले ‘वर्क फ्रॉम होम’

महिला आरक्षण विधेयकावर याआधीही आक्षेप टीप्पणी 

समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांचे वडील दिवंगत मुलायमसिंग यादव यांनी म्हटले होते की, महिला आरक्षणाचा फायदा केवळ श्रीमंत महिलांनाच होईल, असे दोनदा विधान करून वादात सापडले होते. 2012 मध्ये जेव्हा त्यांना कोट्यातील आरक्षणाच्या मागणीबद्दल विचारण्यात आले होते, तेव्हा ते म्हणाले की, “मोठ्या कुटुंबातील मुली आणि महिलांना लाभ मिळेल, आमच्या गावातील गरीब महिलांना मिळणा नाही. कारण त्या आकर्षक दिसत नाहीत. मार्च 2010 मध्ये जेव्हा महिला आरक्षण विधेयक राज्यसभेत मंजुरीसाठी मांडण्यात आले होते, तेव्हा मुलायमसिंग म्हणाले होते की, जर महिला आरक्षण विधेयक सध्याच्या स्वरूपात मंजूर झाले तर ते तरुणांना संसदेत शिट्टी वाजवण्यास उद्युक्त करेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -