घरक्रीडाIND vs ENG Test Series: विराट कोहली संघाबाहेर; आता इंग्लंडविरुद्ध खेळणार 'हा'...

IND vs ENG Test Series: विराट कोहली संघाबाहेर; आता इंग्लंडविरुद्ध खेळणार ‘हा’ धडाकेबाज फलंदाज

Subscribe

Virat Kohli, IND Vs ENG Series: भारतीय संघाला इंग्लंडविरुद्ध 5 सामन्यांची मायदेशात कसोटी मालिका खेळायची आहे. पहिला कसोटी सामना 25 जानेवारीपासून राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम, उप्पल, हैदराबाद येथे खेळवला जाईल. मात्र या मालिकेपूर्वीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. विराट कोहली या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांतून बाहेर झाला आहे. (IND vs ENG Test Series Virat Kohli out of squad Now this dashing batsman Rajat Patidar will play against England)

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) ही माहिती दिली आहे. कोहलीने वैयक्तिक कारणांमुळे ब्रेक घेतल्याचे बीसीसीआयने म्हटले आहे. कोहलीच्या जागी कोण खेळणार याची माहिती समोर आली आहे. क्रिकबझने माहिती दिली आहे, रजत पाटीदारला संघात जागा देण्यात आली आहे.

- Advertisement -

रजतने इंग्लंड लायन्सविरुद्ध शतक झळकावले

मध्य प्रदेशकडून खेळताना देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमक दाखवणारा रजत पाटीदारला कोहलीची जागा देण्यात आली आहे. आतापर्यंत त्याने 55 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 45.97 च्या सरासरीने 4 हजार धावा केल्या आहेत. या काळात त्याने 12 शतके आणि 22 अर्धशतके झळकावली. पाटीदार हा भारत अ संघाचा भाग आहे. अलीकडेच त्याने इंग्लंड लायन्सविरुद्ध 151 धावांची शानदार खेळी केली होती. भारतीय संघ 50 धावांवर 6 विकेट गमावत असताना त्याने या धावा केल्या होत्या.

गेल्या महिन्यात दक्षिण आफ्रिका दौऱ्यातही रजत पाटीदारने भारत अ संघाकडून 111 धावांची खेळी केली होती. त्याच्या उत्कृष्ट फॉर्ममुळे रजत पाटीदारला टीम इंडियात एंट्री मिळाली. सध्या भारतीय संघ युवा खेळाडूंना संघात सहभागी करण्यावर अधिक भर देत आहे, त्यामुळेच पुजाराऐवजी पाटीदारचा संघात समावेश करण्यात आला आहे.

- Advertisement -

भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेचे वेळापत्रक

पहिली कसोटी: 25-29 जानेवारी, हैदराबाद
दुसरी कसोटी: 2-6 फेब्रुवारी, विशाखापट्टणम
तिसरी कसोटी: 15-19 फेब्रुवारी, राजकोट
चौथी कसोटी: 23-27 फेब्रुवारी, रांची
5वी कसोटी: 7-11 मार्च, धर्मशाला

हिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल , कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), आवेश खान.

भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंडचा संघ : बेन स्टोक्स (कर्णधार), रेहान अहमद, जेम्स अँडरसन, गस ऍटकिन्सन, जॉनी बेअरस्टो, शोएब बशीर, डॅन लॉरेन्स, जॅक क्राउली, बेन डकेट, बेन फोक्स, टॉम हार्टले, जॅक लीच, ऑली पोप , ओली रॉबिन्सन, जो रूट आणि मार्क वुड.

(हेही वाचा Rohit Pawar ED Enquiry : “हा संघर्षाचा काळ, पण विजय सत्याचाच”, सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -