घरदेश-विदेशBihar : मुझफ्फरपूरच्या बागमती नदीत 32 शाळकरी मुलांनी भरलेली बोट बुडाली; 10...

Bihar : मुझफ्फरपूरच्या बागमती नदीत 32 शाळकरी मुलांनी भरलेली बोट बुडाली; 10 विद्यार्थी बेपत्ता

Subscribe

Bihar : मुझफ्फरपूरच्या बागमती नदीत (Bagmati river of Muzaffarpur) 32 विद्यार्थ्यांनी भरलेली बोट बुडून मोठा अपघात (Major boat sinking accident) झाला आहे. गायघाट पोलीस ठाण्याच्या बेनियााबाद ओपीच्या बागमती नदीवरील मधुरपट्टी घाटाजवळ ही घटना घडली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून घटनास्थळी लोकांची मोठी झाली आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि एसडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाले आहेत. तसेच स्थानिक गोताखोरांच्या मदतीने एसडीआरएफ टीमने आतापर्यंत 20 हून अधिक विद्यार्थ्यांची सुटका केली आहे. मात्र अजूनही 12 विद्यार्थ्यांचा शोध सुरू आहे. (Bihar Boat carrying 32 school children sinks in Muzaffarpurs Bagmati River 10 students missing)

हेही वाचा – देशातील तीन प्रमुख यंत्रणांच्या प्रमुखांचे पद रिक्त; जबाबदारी देण्याबाबत सरकार संभ्रमात

- Advertisement -

आज (14 सप्टेंबर) सकाळी गायघाट भागातील बलौर हायस्कूलमध्ये सुमारे 32 मुलांसह काही महिला आणि पुरुषही प्रवास करत होते. गेल्या अनेक वर्षांपासून बोटीला दोर बांधून एका टोकावरून दुसऱ्या टोकावर जाण्याचा जीवघेणा प्रवास विद्यार्थ्यांसह येथील स्थानिक नागरिक करत होते. मात्र आज बेनियााबाद ओपी येथील मधुरपट्टी घाटाजवळ बोटीचा दोर तुटल्याने विद्यार्थ्यांनी भरलेली बोट नियंत्रणाबाहेर गेली आणि बागमती नदीत बुडाली. या घटनेनंतर बोटीतील विद्यार्थ्यांनी आरडाओरडा करायला सुरुवात केली. यानंतर नदीत बुडणाऱ्या 20 हून अधिक विद्यार्थ्यांना नदीतून सुखरूप बाहेर काढण्यात आले, मात्र अद्यापही 10 विद्यार्थी बेपत्ता असल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी गावातील नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. याशिवाय बेनियााबाद ओपीचे प्रभारी अभिषेक कुमार घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी स्वतः या प्रकरणाची चौकशी सुरू केली.

- Advertisement -

हेही वाचा – Alphabet Layoffs: Google ची मूळ कंपनी Alphabet नं शेकडो कर्मचाऱ्यांना दिला नारळ

मुख्यमंत्र्यांकडून घटनेच्या चौकशीचे आदेश

बोट अपघातानंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले की, डीएमला या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यास सांगितले आहे. याशिवाय पीडित कुटुंबाला सरकारकडून योग्य ती नुकसानभरपाई दिली जाईल. या घटनेवर बोलताना डीएसपी पूर्व शहरयार यांनी सांगितले की, घटनेचा तपास सुरू आहे. स्थानिक लोकांकडूनही या घटनेची माहिती घेतली जात आहे. बोटीत किती विद्यार्थी आणि नागरिक होते अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यांची माहिती घेतली जात आहे. दोरीच्या साहाय्याने बोट दुसऱ्या टोकावर जात असताना अचानक दोरी तुटल्याने हा अपघात झाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -