घरदेश-विदेशBihar Political : "राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा ज्या राज्यातून जाते...",जदयू...

Bihar Political : “राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा ज्या राज्यातून जाते…”,जदयू नेते नीरज कुमार यांची टीका

Subscribe

पहिल्यांदाच पलटीमार सरकार पाहिले आहे. आता काहीही होऊ शकते. ते सर्व जनता पाहत आहे, अशी प्रतिक्रिया आरजेडी नेते मृत्युंजय तिवारी बिहारच्या राजकारणावर दिली आहे.

पाटणा : काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांची ‘भारत जोडो न्याय यात्रा’ सुरू आहे. तर दुसरीकडे बिहारमध्ये राजकीय परिस्थिती बदलेली आहे. नितीश कुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. आता नितीशी कुमार आणि भाजपाच्या पाठिंब्यासोबत बिहारमध्ये सरकार स्थापन केले आहे. बिहारचे राज्यपाल राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी नितीश कुमार यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली. ‘राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा ही ज्या राज्यातून जाते. त्या राज्यातील काँग्रेसचे मित्रपक्ष त्यांची साथ सोडत आहे, अशी टीका जनता दलचे नेते नीरज कुमार यांनी केली आहे.

राहुल गांधीच्या ‘भारत जोडो न्याय यात्रा’बाबत नीरज कुमार म्हणाले, “राहुल गांधींची भारत जोडो, न्याय यात्रा काढण्याचा अधिकार आहे. या यात्रेचा परिणाम म्हणजे ही यात्रा पश्चिम बंगालमध्ये पोहोचल्यावर ममता बॅनर्जी या इंडियातून बाहेर पडल्या आणि आता ही यात्रा बिहारमध्ये दाखल होणार आहे. बिहारमध्ये राजकीय परिस्थिती बदलत असून यामुळे राहुल गांधींना आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. कारण त्यांचे रणनीतीत काय चुकते? कारण राहुल गांधींची यात्रा ज्या राज्यातून जाते, तिथे त्यांचे मित्रपक्ष त्यांची साथ सोडत आहे, अशी टीका नीरज कुमार यांनी केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Bihar Political : नितीश कुमार यांनी नवव्यांदा घेतली बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ

पहिल्यांदाच पलटीमार सरकार पाहिले

बिहारच्या राजकीय परिस्थितीवर आरजेडी नेते मृत्युंजय तिवारी म्हणाले, “पहिल्यांदाच पलटीमार सरकार पाहिले आहे. आता काहीही होऊ शकते. ते सर्व जनता पाहत आहे. नितीश कुमार यांच्यासह तेजस्वी यादव यांनी सरकारमध्ये उपमुख्यमंत्री दीड वर्षाचे काम विसरू शकत नाही. आता पुढे जे काही होईल, त्यांचा सामना केला जाईल, असेही ते म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -