घरदेश-विदेशभाजप सनी देओलला उतरवणार निवडणुकीच्या रिंगणात?

भाजप सनी देओलला उतरवणार निवडणुकीच्या रिंगणात?

Subscribe

बॉलिवूड अभिनेता सनी देओल देखील लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा रंगत आहे. भाजप सनी देओल याला उमेदवान बनवू इच्छित आहे. पंजाबच्या गुरदासपूर लोकसभा मतदार संघातून अभिनेता सनी देओलला भाजप उभे करण्याचा प्रयत्न करत आहे. याबाबत सध्या फक्त चर्चा सुरु आहे. अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये गुरदासपूर लोकसभा मतदार संघाता भाजपला विजय मिळवण्यात यश आले होते. २०१४ ला अभिनेता विनोद खन्ना या मतदार संघातून खासदार झाले होते. खासदार विनोद खन्ना यांचे निधन झाल्यानंतर त्याठिकाणी २०१७ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार स्वर्ण सलारिया यांचा पराभव झाला होता. काँग्रेसचे उमेदवार सुनिल जाखड यांनी स्वर्ण यांचा पराभव केला होता. त्यानंतर आता या मतदारसंघामध्ये भाजप पुन्हा एका चांगल्या उमेदवाराच्या शोधात आहे. त्यासाठी ते अभिनेता सनी देओल याला या मतदार संघातून उभे करु इच्छित आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -