घरदेश-विदेशवाजपेयींच्या अस्थी विसर्जनावरून 'राजकारण'

वाजपेयींच्या अस्थी विसर्जनावरून ‘राजकारण’

Subscribe

अटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थि देशभरातील प्रमुख नद्यांमद्ये विसर्जन करण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. भाजपच्या या निर्णयामागे राजकारण असल्याचा आरोप वाजपेयी यांच्या भाची करूणा शुक्ला आणि काँग्रेसने केला आहे.

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थि विसर्जनावरून आता वादापेक्षा राजकारणाला सुरूवात झाली आहे. वाजपेयी यांच्या अस्थि संपूर्ण देशभरात फिरवून त्यांचे देशातील प्रमुख नद्यांमध्ये विसर्जन करण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. भाजपचा हा निर्णय म्हणजे राजकीय हेतूनं प्रेरित आहे. शिवाय, भाजप लोकसभा २०१९च्या निवडणुकासाठी याचा फायदा उठवत असल्याचा आरोप वाजपेयी यांच्या भाची करूणा शुक्ला यांनी केला आहे. तसेच भाजपच्या या राजकारणामुळे आपण दु:खी असल्याचे देखील करूणा शुक्ला यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनानंतर नव्या वादाला तोंड फुटले आहे. त्यानंतर भाजपने देखील त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. दरम्यान, काँग्रेसने देखील अस्थि विसर्जनाच्या निर्णयावरून भाजपला लक्ष्य केले आहे. भाजप खेळत असलेली ही राजकीय खेळी दुर्दैवी आहे. शिवाय, भाजपनं अटलबिहारी वाजपेयी यांच्या विचारांवर चालावे असा सल्ला देखील काँग्रेसनं भाजपला दिला आहे.

भाजपचे प्रत्युत्तर

दरम्यान, अटलबिाहारी वाजपेयी यांच्या भाची आणि काँग्रेसच्या आरोपाला भाजपने देखील प्रत्युत्तर दिले आहे. वाजपेयींच्या अस्थि विसर्जनाच्या मुद्यावरून करूणा शुक्ला राजकारण करू पाहत आहेत ते दुर्दैवी आहे. शिवाय, अनेक जण भाजपच्या या निर्णयावर टीका करत आहेत. देशातील प्रमुख नद्यांमद्ये अस्थि विसर्जनाचा निर्णय पहिल्यांदाच झाला आहे असे नाही. यापूर्वी देखील अनेक पंतप्रधानांच्या अस्थि या देशभरात दर्शनासाठी फिरवल्या गेल्या. शिवाय, देशातील प्रमुख नद्यांमद्ये त्यांचे विसर्जन देखील केले गेले. त्यासाठी भाजपने पंडित जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांचा देखील दाखल दिला. तसेच यामागे कोणतेही राजकारण नसून लोकांच्या आपल्या लाडक्या पंतप्रधानांच्या अस्थिंचे दर्शन घेता यावे असा हेतू असल्याचे भाजपने स्पष्ट केले. तसेच अटलबिहारी वाजपेयी हे बिगर काँग्रेसी असे पंतप्रधान होते. तसेच त्यांनी ५ वर्षे पंतप्रधानपदाचा कार्यकाळ अत्यंत यशस्वीरित्या पार पाडला होता. त्यामुळे देशभरातील लाखो लोकांचं त्यांच्यावर प्रेम होतं. असे देखील भाजपच्या प्रवक्त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -