घरमहाराष्ट्रखड्ड्यांवरुन धनंजय मुंडेंची चंद्रकांत पाटलांवर बोचरी टीका

खड्ड्यांवरुन धनंजय मुंडेंची चंद्रकांत पाटलांवर बोचरी टीका

Subscribe

रस्त्यावरील जीवघेण्या खड्ड्यांमुळे युवासेना प्रसुख आदित्य ठाकरे यांच्या आलिशान गाडीचा टायर फुटला. त्यामुळे आता आदित्य ठाकरे यांनी खड्डा दाखवला आहे. त्यामुळे 'खड्डे दाखवा अन् हजार रुपये बक्षीस मिळवा' या योनेद्वारे त्यांना हजार रुपये पाठवा' अशी बोचरी टीका धनंजय मुंडे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर केली आहे.

‘खड्डे दाखवा अन् हजार रुपये बक्षीस मिळवा’ या योजनेनुसार एक हजार रुपये युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना आता पाठवा’ अशी बोचरी टीका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या गाडीला रस्त्यावरच्या खड्ड्यामुळे जोरदार झटका बसला. त्याचा फोटो काढून त्यांनी ट्विट देखील केलं. याचाच संदर्भ घेत धनंजय मुंडेंनी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.

आदित्य ठाकरेंना हजार रुपये पाठवा – धनंजय मुंडे 

नाशिक दौऱ्याकरता युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे निघाले होते. त्या दरम्यान अचानक त्यांच्या गाडीला धक्का बसला. रस्त्यांवरील जीवघेण्या खड्ड्यांमुळे आदित्य ठाकरे यांची गाडी मध्येच थांबली. गाडी का थांबली हे पाहिले असता खड्ड्यांमुळे त्यांच्या आलिशान गाडीचा टायर फुटल्याचे समोर आले. टायर फुटल्याने धनंजय मुंडेंनी ट्विट करत चंद्रकांत पाटील यांना राज्यातील रस्त्यांची अवस्था काय झाली आहे ते पहा असे ‘खड्डे’ बोल सुनावले! ‘आदित्य ठाकरे यांनी तुम्हाला खड्डा दाखवला आहे. त्यामुळे ‘खड्डे दाखवा अन् हजार रुपये बक्षीस मिळवा’ या योजनेनुसार आदित्य यांना हजार रुपये पाठवून द्या’ असा टोला धनंजय मुंडे यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला आहे.

- Advertisement -

खड्डे बुजवण्यासाठी नवीन डेडलाईन

दरम्यान, राज्यातील सर्व खड्डे बुजवण्यासाठी आता एक नवीन डेडलाईन देण्यात आली आहे. राज्यातील सर्व खड्डे येत्या डिसेंबर २०१८ पर्यंत बुजवण्यात येतील, अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ट्विटरद्वारे दिली आहे. खड्डे बुजवण्यासाठी २०१७ च्या अर्थसंकल्पातील मंजूर कामे तातडीने सुरु करण्याचे आदेश दिले असल्याचे देखील चंद्रकांत पाटील यांनी ट्विटरद्वारे सांगितले आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -