यामुळे भाजप नेते बाबुल सुप्रियो यांनी राजकारणाला केला रामराम

BJP leader Babul Supriyo quits politics, says 'Alvida' in his Facebook post
यामुळे भाजप नेते बाबुल सुप्रियो यांनी राजकारणाला केला रामराम

माजी केंद्रीय मंत्री आणि बंगालचे भाजपचे मोठे नेते बाबुल सुप्रियो यांनी राजकारणाला अलविदा केला आहे. शनिवारी फेसबुक पोस्टद्वारे त्यांनी राजकारणातून संन्यास घेत असल्याचे सांगितले. सध्या बाबुल सुप्रियो यांची ही फेसबुक पोस्ट चर्चेत आली असून राजकारण सोडण्यामागचे अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळातून हटवल्यामुळे बाबुल नाराज असल्याचे सांगितले जात आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून बाबुल यांचे मौन आणि भाजपमधील कमी उपस्थिती यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत होते. आता त्यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर करून सर्व चर्चांना पूर्णविराम लावला आहे.

बाबुल सुप्रियो यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहिले की, ‘अलविदा, मी कोणत्याही राजकीय पक्षात जात नाही आहे. टीमएसी, काँग्रेस, सीपीआय (एम) यामध्ये मला कोणी बोलावले नाही आहे. मी कुठे जात नाही आहे. सामाजिक कार्य करण्यासाठी राजकारणाची गरज नाही.’ त्यामुळे त्यांनी आता आपला मार्ग बदलण्याचा निर्णय घेतला आहे.

पुढे सुप्रियो म्हणाले की, ‘लोकांची सेवा करण्यासाठी राजकारणात राहण्याची गरज नाही आहे. राजकारणातून वेगळे होऊन आपला उद्देश पूर्ण करू शकतो. मी नेहमी एकाच टीमचा खेळाडू राहिलो आहे. नेहमी एका टीमला सपोर्ट केले आहे. एकाच पक्षाचे समर्थन केले. त्यामुळे हा निर्णय पक्ष समजतील.’

‘पक्षात माझे काही मतभेद होते. निवडणुकीपूर्वी हे सर्व समोर आले होते. विधानसभा निवडणुकीतील पराभवासाठी मी जबाबदार आहे. परंतु दुसरे नेते देखील जबाबदार होते. बऱ्याच काळापासून पक्ष सोडू इच्छित होतो. आता राजकारणात राहायचे नाही, याची तयारी केली होती. परंतु भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी रोखल्यामुळे हा निर्णय सतत मागे घेतला,’ असे बाबुल यांनी पोस्ट लिहिले आहे. बाबुल सुप्रियो हे मोदी मंत्रिमंडळात पर्यावरण, वन आणि हवामान बदल राज्यमंत्री होते.