घरमहाराष्ट्रMaharashtra : राज्य सरकारची खैरात; भाजपा-अजित पवार गटाशी संबंधित साखर कारखान्यांना 1898...

Maharashtra : राज्य सरकारची खैरात; भाजपा-अजित पवार गटाशी संबंधित साखर कारखान्यांना 1898 कोटींचे कर्ज

Subscribe

मुंबई : राज्य सहकारी बँकेने सत्ताधारी पक्षातील नेत्यांच्या साखर कारखान्यांसाठी काही दिवसांपूर्वीच तिजोरी उघडली होती. यानंतर आता राज्य सरकार स्वत:च्या जबाबदारीवर राष्ट्रीय सहकार विकास निगमकडून कर्ज घेऊन साखर कारखान्यांना देणार असल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे आचारसंहिता लागू होण्याच्या आधी मंत्रीमंडळ उपसमितीने या प्रस्तावाला मान्यता दिल्याचीही माहिती मिळत आहे. (Maharashtra state government bailout 1898 crore loan to sugar mills belonging to BJP Ajit Pawar group)

हेही वाचा – Raj Thackeray Meet Amit Shah : राज ठाकरे अमित शहांमध्ये अर्धा तास चर्चा; युतीची घोषणा मुंबईत?

- Advertisement -

राज्य सरकारच्या एका समितीने 13 साखर कारखान्यांची निवड केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या आधी राज्यातील भाजपा आणि अजित पवार यांच्याशी संबंधित 13 साखर कारखान्यांना 1898 कोटींचे कर्ज देण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये भाजपाचे 5, राष्ट्रवादीचे 7 आणि एक कारखाना काँग्रेसशी संबंधित आमदाराचा आहे.

काही दिवसांपूर्वीच काँग्रेसला रामराम करत भाजपामध्ये आलेल्या माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपाने राज्यसभेत पाठवल्यानंतर त्यांच्या भाऊराव चव्हाण सहकारी कारखान्याला थकहमी पोटी 147.79 कोटी रुपयांची मदत केली होती. यानंतर आता बारामती लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांना खूश करण्यासाठी त्यांच्या राजगड साखर कारखान्यास 80 कोटी रुपयांची कर्जहमी देण्यात येणार असल्याचीही माहिती मिळत आहे.

- Advertisement -

भाजपाशी संबंधित कारखाने

  1. संत दामाजी (मंगळवेढा) – 100 कोटी
  2. वृद्धेश्वर (पाथर्डी) – 99 कोटी
  3. सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे (कोपरगाव) – 125 कोटी
  4. तात्यासाहेब कोरे वारणानगर (कोल्हापूर) – 350 कोटी
  5. बसवराज पाटील यांचा विठ्ठलसाई (धाराशिव) – 100 कोटी

हेही वाचा – Lok Sabha 2024 : जागावाटपाचा तिढा सुटण्यापूर्वीच उतावळे इच्छुक स्वत:च चढले उमेदवारीच्या बोहल्यावर

अजित पवार गटाशी संबंधित कारखाने

  1. लोकनेते सुंदररावजी सोळंके साखर कारखाना (बीड) – 104 कोटी
  2. किसनवीर (सातारा) – 305 कोटी
  3. किसनवीर (खंडाळा) – 150 कोटी
  4. लोकनेते मारोतराव घुले पाटील ज्ञानेश्वर कारखाना (नेवासा) – 150 कोटी
  5. अगस्ती (अहमदनगर) – 100 कोटी
  6. अंबाजोगाई (बीड) – 80 कोटी
  7. शिवाजीराव नागवडे (श्रीगोंदा) – 110 कोटी
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -