घरताज्या घडामोडीभाजपा आमदारांचं आंदोलन, ऑक्सिजन सिलिंडर घेऊन पोहोचले थेट दिल्ली विधानसभेत

भाजपा आमदारांचं आंदोलन, ऑक्सिजन सिलिंडर घेऊन पोहोचले थेट दिल्ली विधानसभेत

Subscribe

दिल्ली विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरूवात झाली आहे. आज सकाळी ११ वाजता या अधिवेशनाला सुरूवात झाली. परंतु कामकाज सुरू झाल्यानंतर आपच्या आमदारांनी एलजी सक्सेना यांच्या विरोधात घोषणाबाजी करत गोंधळ घातला. त्यानंतर भाजपनेही आपविरोधात घोषणाबाजी करण्यास सुरूवात केली. दरम्यान, सभागृह १० मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले. भाजपचे आमदार ऑक्सिजन मास्क घालून आणि ऑक्सिजन सिलेंडर घेऊन थेट दिल्ली विधानसभेत पोहोचले. ज्यामुळे सभापती आश्चर्यचकित झाले.

जेव्हा भाजप आमदार ऑक्सिजन सिलेंडर घेऊन आत पोहोचले तेव्हा सभापतींनी त्यांना बाहेर काढण्याचे निर्देश दिले. याच्या निषेधार्थ भाजप आमदारांनी महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर धरणं आंदोलन केलं. तुम्ही यांना आत येण्याची परवानगी कशी काय दिलीत, असा सवाल सभापतींनी सुरक्षा दलांना विचारला. त्याच्या उपयोग डोकी फोडण्यासाठी केला जाऊ शकतो. त्यामुळे पहिलं यांना बाहेर काढा, असंही ते म्हणाले.

- Advertisement -

ऑक्सिजन सिलेंडरबरोबरच भाजप आमदारांनी गळ्यात फलकही घातले होते. दिल्लीचे लोक विषारी हवेने मरत आहेत. केजरीवाल राजीनामा द्या, राजीनामा द्या, अशा घोषणा आमदारांकडून देण्यात आल्या. दिल्लीतील वायू प्रदूषणावर चर्चा करण्याची मागणी विरोधकांनी केली आहे. मात्र, विधानसभा अध्यक्ष रामनिवास गोयल यांनी यासाठी परवानगी दिलेली नाही.

हिवाळी अधिवेशन १८ जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि आपमध्ये आरोप-प्रत्यारोपांची फैरी सुरू आहे. त्यामुळे हे तीन दिवसांचं अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

- Advertisement -

हेही वाचा : अयोध्येतील राम मंदिरावर दहशतवादी हल्ल्याचं सावट; गुप्तचर यंत्रणेकडून सतर्कतेचा


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -