घरमहाराष्ट्रपुणेजी २० परिषदेतील कमळ भारताचे, भाजपा शाश्वत विकास करतो - नारायण राणे

जी २० परिषदेतील कमळ भारताचे, भाजपा शाश्वत विकास करतो – नारायण राणे

Subscribe

पुणे – जी २० परिषदेला आज पुण्यात सुरुवात झाली. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी शाश्वत विकास म्हणजे कमळ आहे. भाजप शाश्वत विकास करतो, असं राणे म्हणाले. पत्रकार परिषदेत त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने जी २० परिषद देशातील विविध शहरात होत आहे. ही आंतरराष्ट्रीय संस्था असून त्याचे परिषदेचे उद्घाटन करण्याचा मान मला मिळाला हे माझे सौभग्य आहे. भारत एक प्रगतशील देश असून सन २०१४, मध्ये भारत जगात दहाव्या क्रमांकावर होता तो आत्ता पाचव्या क्रमांकावर आला आहे. पंतप्रधान यांच्या पुढाकाराने आपण प्रगती करत आहोत, असं नारायण राणे म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – जी २० परिषदेला सुरुवात, नारायण राणेंनी केले उद्घाटन; पायाभूत सुविधांवर होणार विचारमंथन

‘जी -२० परिषदेमधील कमळ हे भाजपाचे नसून ते भारताचे आहे. शाश्वत विकास म्हणजे कमळ आहे. कमळ म्हणजे भाजप नाही, जो भाजपामध्ये येईल, त्याचा शाश्वत विकास होईल. भाजपा शाश्वत विकास करतो,’ असं नारायण राणे म्हणाले.

- Advertisement -

अमेरिका, चीन, जपान, जर्मनी यानंतर आपली पाचवी मोठी अर्थव्यवस्था आहे. पंतप्रधान जे बोलतात ते करतात, याबाबत मला विश्वास आहे. त्यामुळे आपण नक्कीच आर्थिक महासत्ता होऊ. ५० टक्के लोकसंख्या ही शहरात राहत असून त्यांना पायाभूत सुविधा मिळाल्या पाहिजेत, यादृष्टीने परिषदेमध्ये चर्चा होणार आहे, अशी माहितीही राणेंनी यावेळी दिली. पुणे, मुंबई अशी शहरे गुंतवणुकीस आकर्षित करत आहे. भारत प्रगती करत असून त्याचा फायदा आपण घेतला पाहिजे, असं आवानही त्यांनी केलं.

सूक्ष्म , लघु आणि मध्यम उद्योग राज्यात येण्याच्या दृष्टीने केंद्र सरकार सर्व योजना राबवण्यासाठी इच्छुक आहे. प्रत्येक जिल्ह्यानुसार धोरण ठरविण्यात येत आहे. देशाची अर्थव्यवस्था मजबूत झाल्यास सामान्य नागरिकाचा जी २० परिषदेमधून विकास होईल. अमेरिकाची २० ट्रिलियन अर्थव्यवस्था आहे. भारताची सध्या साडेतीन ट्रिलियन असून ती पाच ट्रिलियन करण्याचा प्रयत्न आहे, असा विश्वासही नारायण राणे यांनी बोलून दाखवला.

हेही वाचा – संजय राऊतांची ऑन कॅमेरा शिवीगाळ, नारायण राणेंबाबत बोलताना जीभ घसरली

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -