घरदेश-विदेशपंजाबमध्ये १३ जागांवरून निवडणूक लढणार आप - केजरीवाल

पंजाबमध्ये १३ जागांवरून निवडणूक लढणार आप – केजरीवाल

Subscribe

आगामी निवडणुकांमध्ये आम आदमी पार्टी(आप) चे उमेदवार १३ जागांवरून लोकसभा निवडणुक लढवणार असल्याची घोषणा पक्षाचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. पंजाब येथे आयोजित एका सभेत त्यांनी भाजपवर टीका केली.

देशात निवडणूकांचे वारे वाहण्यास सुरुवात होत आहे. अशामध्ये राजकीय पंक्षांनी आपले उमेदवार उभे करण्यास सुरूवात केली आहे. आम आदमी पार्टी (आप) चे अध्यक्ष आणि दिल्लेचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंजाब येथील आपल्या उमेदवारांची नावे घोषीत केली आहेत. यावेळी आप पंजाबमधून १३ जागांवरून निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. पंजाब येथे आयोजित एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी ही घोषणा केली. यावेळी विरोधकांवरही त्यांनी टीका केली.

- Advertisement -

काय म्हणालेत केजरीवाल

कार्यक्रमात पत्रकारांशी बोलताना केजरीवाल म्हणाले की,”लोकांना बदल हवा आहे. ते मोदी सरकारला कंटाळले आहे. अमित शहा आणि मोदी यांनी देशाचे नुकसान केले आहे. लोकांच्या मनात ते विष कालवत आहेत. जर ते पून्हा सत्तेत आलेत तर हा देश विभक्त होईल.” ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या निवडणुकीतील उमेदवारांची नावे त्यांनी घोषीत केली आहेत. संगरूर, फरीदकोट,होशियारपूर,अमृतसर आणि आनंदपूर या मतदार संघातील उमेदवारांची नावे त्यांनी घोषीत केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -