घरक्राइमसिनेमालाही लाजविणारा सुरू होता कुंटणखाना; कधी लैंगिक अत्याचार, तर कधी मारहाण असं बरच...

सिनेमालाही लाजविणारा सुरू होता कुंटणखाना; कधी लैंगिक अत्याचार, तर कधी मारहाण असं बरच…

Subscribe

5 ऑक्टोबर रोजी बांग्लादेश हून एक ई-मेल आला होता. या ई-मेलमध्ये एका 19 वर्षाच्या मुलीला नोकरी लावण्याचा बहाण्याने बांग्लादेशहून भारतात आणले असून, ती मुलगी डोंबिवलीत आहे.

ठाणे : नोकरी आणि उपचाराचे आमिष देऊन बांगलादेशमधून भारतात काही तरुणींना आणून त्यांच्याकडून देहविक्री करून घेतली जात होती. या रॅकेटचा भांडाफोड पोलिसांनी केला आहे. या कारवाईत आरोपींना अटक करून पीडितांची सुटका करण्यात आली आहे. हा सगळा प्रकार डोंबिवली भागात सुरू होता. (Kuntankhana started embarrassing even the cinema Sometimes sexual abuse sometimes beating…)

5 ऑक्टोबर रोजी बांग्लादेश हून एक ई-मेल आला होता. या ई-मेलमध्ये एका 19 वर्षाच्या मुलीला नोकरी लावण्याचा बहाण्याने बांग्लादेशहून भारतात आणले असून, ती मुलगी डोंबिवलीत आहे. तिला वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडत असल्याची माहिती देण्यात आली होती. या घटनेचे गांभीर्य ओळखून समाजसेविका शिल्पा वानखेडे यांनी आपल्या काही सहकाऱ्यांसोबत पुण्याहून ठाणे गाठले. ठाण्याला येऊन त्यांनी ठाण्यात अँटी ह्यूमन ट्राफिकिंग सेलच्या (Anti Human Trafficking Cell) अधिकाऱ्यांची भेट घेत त्यंना माहिती दिली. माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी स्थानिक मानपाडा पोलीस ठाण्याच्या मदतीने डोंबिवलीतील हेदूटणे गावाजवळ पोलिसांनी छापा टाकला. यावेळी काही जणाला पोलिसांनी ताब्यात घेत चौकशी सुरू केली.

- Advertisement -

धक्कादाय माहिती आली समोर

मानपाडा पोलिसांनी छापा टाकला असताना पोलिसांना तपासा दरम्यान धक्कादायक माहिती मिळाली. काही आरोपीनी बांग्लादेशातील महिलांना नोकरी व उपचाराचे आमिष दाखवून त्यांना बांग्लादेशमधून भारतात आणले होते. या मुलींसोबत आधी त्यांनी लैंगिक अत्याचार केला. नंतर या मुलींना जबरदस्तीने देहव्यापारात ढकलण्यात आले. देह व्यापारास नकार देणाऱ्या मुलींना मारहाण देखील केली जात असे.

हेही वाचा : BREAKING : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीआधी काँग्रेसने घेतला ‘हा’ मोठा निर्णय; राहुल गांधींकडून घोषणा

- Advertisement -

या आरोपींना ठोकल्या बेड्या

मानपाडा पोलिसांनी कारवाई करत युनूस शेख उर्फ राणा, साहिल शेख, फिरदोस सरदार, आयुब शेख, बीपलॉप खान या पाचही दलालांना बेड्या ठोकल्या आहेत.

हेही वाचा : जम्मू काश्मीरला निवडणुकीची प्रतीक्षाच; निवडणूक आयोगाने केले सुरक्षेचे कारण पुढे

भारतीय रहिवासी असल्याचे कागदपत्रेही बनवले

विशेष म्हणजे या आरोपीने या महिलांसाठी डोंबिवलीत भाड्याने घर घेत घर मालकाच्या मदतीने या महिलांचे भारतीय असलेले कागदपत्रे बनवत या महिलांना महाराष्ट्रातील अनेक लॉजिंग आणि बोर्डिंगमध्ये वेश्या व्यवसाय करण्यासाठी पाठवत होते. सध्या पोलिसांनी या आरोपीसह त्या घरमालकाला देखील अटक केली असून, कोणत्याही भाडेकरूला घर देताना पोलीस स्थानकाचे एनओसीसह भाडेकरूचे प्रस्ताव तपासून घर भाड्याने देण्यात यावे अशी आवाहन पोलिसांकडून देत तपास सुरू केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -