घरताज्या घडामोडीवाचा बजेटमध्ये काय झाले स्वस्त आणि महाग

वाचा बजेटमध्ये काय झाले स्वस्त आणि महाग

Subscribe

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी आज २०२०-२१ चे बजेट सादर केले. या बजेटमध्ये प्रामुख्याने करदात्यांना दिलासा मिळाला असून विविध क्षेत्रांसाठी बजेटमध्ये खास तरतूदी करण्यात आल्या आहेत. पण सर्वासामान्यांना उत्सुकता आहे ती दैनंदिन जीवनातील वस्तूंच्या भाववाढीबद्दल जाणून घेण्याची. यामुळे या बजेटमध्ये काय स्वस्त झाले व काय महाग हे जाणून घेणे गरजेचे आहे.

- Advertisement -

ही उत्पादन झाली महाग

पादत्राणे
येत्या काही दिवसात चपला, बूट, सँडल यांच्या किंमतीत वाढ होणार आहे. बजेटमध्ये पादत्राणांवरील सीमा शुल्कात १० टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. आधी हे शुल्क २५ टक्के होते. पण आता त्यात वाढ करण्यात आल्याने ते ३५ टक्के झाले आहे.

- Advertisement -

फर्निचर

बजेटमध्ये फर्निचर उत्पादनांवरील सीमा शुल्कात ५ टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे फर्निचरवरील सीमा शुल्क २० वरून २५ टक्के झाले आहे.

सिगारेट/ तंबाखू

सर्वसामान्यांच्या या बजेटमध्ये सिगरेट आणि तंबाखूजन्य उत्पादन शुल्कात वाढ करण्याचा प्रस्ताव आहे. यामुळे येत्या काही दिवसात सिगारेट आणि तंबाखूजन्य उत्पादन महागणार आहेत. पण वीडीवरील शुल्कात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

Today's Petrol & diesel prices in Mumbai and delhi
पेट्रोल, डिझेल

पेट्रोल-डिझेल

तसेच पेट्रोल-डिझेल, सोने, काजू, रिक्षाचे सुटे भाग, सिंथेटीक रबर, ऑप्टीकल फायबर, स्टेनलेस प्रॉडक्ट, लाऊडस्पीकर, व्हिडीओ रेकॉर्डर, पीवीसी आणि टाईल्सच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे.

एसी, सीसीटीव्ही कॅमेरा

तसेच एसी, सीसीटीव्ही कॅमेरा, हॉर्न यासारखे उत्पादनांच्या किंमतीत वाढ होणार आहे. तसेच परदेशी वैद्यकिय उपकरणांच्या किंमतीतही वाढ होणार आहे.

हे उत्पादन होणार स्वस्त

वस्त्रोद्योग क्षेत्राला चालना देण्यासाठी पीटीए वरील डंपिंगविरोधी शुल्क काढून टाकण्यात आले आहे. न्यूज प्रिंट आणि कोटेड पेपरच्या आयातीवरील शुल्क १० टक्क्यावरून कमी करुन ५ टक्के करण्यात आला आहे. फ्यूज, रसायने आणि प्लास्टीक सारख्या कच्च्या मालावरील शुल्कात कपात करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -