घरताज्या घडामोडीमद्यधुंद पोलिसाची हॉटेलचालकाला मारहाण, सीसीटीव्हीमध्ये दृश्ये कैद

मद्यधुंद पोलिसाची हॉटेलचालकाला मारहाण, सीसीटीव्हीमध्ये दृश्ये कैद

Subscribe

दारूचे पैसे मागितल्याने मद्यधुंद पोलिसाने हॉटेलमालकाला शिवीगाळ व मारहाण केल्याची घटना शुक्रवारी (दि.३१) रात्री लेखानगरमध्ये घडली. ही सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात मद्यधुंद पोलिसाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. भगवान एकनाथ जाधव असे गुन्हा दाखल झालेल्या पोलिसांचे नाव आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, लेखानगरमधील हॉटेल स्पॅक्समध्ये शुक्रवारी (दि.३१) रात्री ११.३० वाजेच्या सुमारास संशयित पोलीस कर्मचारी भगवान एकनाथ जाधव याने त्याच्या साथीदारासोबत येऊन काउंटरवरून एक मद्याची बाटली व पाण्याची बाटली घेतली. हॉटेलचालक भास्कर ऐतप्पा शेट्टी यांनी त्यांच्याकडे पैशांची मागणी केली. राग अनावर झाल्याने जाधव याने पोलीस असल्याचे ओळखपत्र दाखवून शेट्टी यांना शिवीगाळ व मारहाण केली. या घटनेची दृश्ये सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहेत. हॉटेलचालक भास्कर शेट्टी यांनी संशयित पोलीस कर्मचार्‍याविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक शिंदे करत आहेत.

संबंधित पोलिसाविरुद्ध अंबड पोलीस तक्रार दाखल झाली आहे. याप्रकरणी चौकशी केली जात असून त्या पोलिसावर कारवाई केली जाणार आहे.
विजय खरात, पोलीस उपायुक्त

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -