घरताज्या घडामोडीरस्ता अपघातानंतर शबाना आझमी यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज

रस्ता अपघातानंतर शबाना आझमी यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज

Subscribe

शबाना आझमी रूग्णालयातून घरी आल्या असून, गेल्या महिन्यात एका कार अपघातात दुखापत झाल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. शबाना आझमी यांची प्रकृती सुधारली असून त्या आता पूर्णपणे बऱ्या झाल्या आहेत.

गेल्या महिन्यात झालेल्या एका कार अपघातात जखमी झालेल्या शबाना आझमी यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. शबाना आझमी यांची प्रकृती सुधारली असून त्या आता पूर्णपणे बऱ्या झाल्या आहेत. तसेच, शबाना आझमी यांनी ट्विटरवर स्वत:चा एक फोटो शेअर करून त्याखाली सर्वांचे आभार मानत डॉक्टर टीम, टीना अंबानी आणि कोकिलाबेन अंबानी हॉस्पिटलच्या कर्मचार्यांचे आभार मानले आहेत. ही बातमी ऐकून त्यांचे चाहते आणि मित्र खूप खूष झाले आहेत. काही अभिनेत्यांनी त्यांच्या ट्विटला रिट्विट केले आहे. अभिनेता विक्रांत मस्सेने तिच्या ट्विटवर प्रतिक्रिया देत “तुला परत पाहून मला आनंद झाला!” तर, गायिका रेखा भारद्वाज यांनी लिहिले की “आजची शबानाजींची ही सर्वात चांगली बातमी आहे.”

- Advertisement -

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर झाला होता अपघात 

१ जानेवरी रोजी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर जेव्हा त्यांच्या कारला अपघात झाला होता. त्यावेळी त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. या अपघातात त्यांचा नवरा ज्येष्ठ संगीतकार जावेद अख्तर, कारचालक कमलेश कामथ हे ही जखमी झाले होते. त्यावेळी त्यांना नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात नेण्यात आले आणि नंतर त्याच दिवशी अंधेरी येथील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात हलविण्यात आले. यानंतर शबाना आझमी यांच्या कारचालकावर दुर्लक्षित वाहन चालवल्या प्रकरणी गुन्हा दाखल करणे टाळत केवळ एक नोटीस बजावण्यात आली होती.

हेही वाचा – मुंबई पुणे महामार्गावर शबाना आझमी यांच्या गाडीला अपघात

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -