घरदेश-विदेशCAA : काँग्रेसकडून सतत तुष्टीकरणाचे राजकारण, सीएएच्या माध्यमातून अमित शहांचा निशाणा

CAA : काँग्रेसकडून सतत तुष्टीकरणाचे राजकारण, सीएएच्या माध्यमातून अमित शहांचा निशाणा

Subscribe

हैदराबाद : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सुधारित नागरिकत्व कायद्याबाबतची (CAA) भूमिका स्पष्ट करताना काँग्रेसवर निशाणा साधला. या देशात राहण्याचा जेवढा अधिकर मला आणि तुम्हाला आहे, तेवढाच अधिकार आता प्रत्येक निर्वासिताला आहे, असे ते म्हणाले. काँग्रेस सतत तुष्टीकरणाचे राजकारण करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

हेही वाचा – Prakash Ambedkar : संजय राऊत वंचितबाबत खोटी माहिती देतात, प्रकाश आंबेडकरांचे धक्कादायक विधान

- Advertisement -

लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर मोदी सरकारने काल, सोमवारी नागरिकत्व (सुधारणा) कायदा (CAA), 2019 देशभरात लागू करण्याची अधिसूनचना जारी केली. या सुधारित कायद्याद्वारे पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमधील गैर-मुस्लीम स्थलांतरितांना भारतीय नागरिकत्व देण्यात येईल.

सिकंदराबाद येथे सोशल मीडिया वॉरियर्स मेळाव्यात अमित शहा मार्गदर्शन करत होते. ते म्हणाले, आम्ही सीएए आणू असे सांगितलेच होते. स्वातंत्र्यानंतर आपल्या राज्यघटनेच्या निर्मात्यांनी आश्वासन दिले होते की बांगलादेश, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधून येणाऱ्या निर्वासितांना आम्ही नागरिकत्व देऊ. मात्र व्होट बँक आणि तुष्टीकरणाच्या राजकारणामुळे काँग्रेसने त्याला विरोध केला. लाखो लोक आपला धर्म आणि प्रतिष्ठा वाचवण्यासाठी या देशात आले, पण त्यांना नागरिकत्व मिळाले नाही, असे ते म्हणाले.

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बांगलादेश, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील हिंदू, बौद्ध, शीख, जैन आणि पारशी लोकांना नागरिकत्व देऊन त्यांचा सन्मान केला आहे. आम्ही या निर्वासितांना सन्मानजनक जीवन जगण्याची संधी दिली आहे. कालपासून या देशात येणाऱ्या प्रत्येक शरणार्थीला तुमच्या आणि माझ्याइतकेच अधिकार आहेत, असे ते म्हणाले.

हेही वाचा – Sanjay Raut : मी काय खोटं बोललो स्पष्ट करा; संजय राऊतांचा प्रकाश आंबेडकरांना उलट प्रश्न

मोदींनी देशाला स्थैर्य दिले

गेल्या 10 वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला राजकीय स्थैर्य दिले आहे. ‘आया राम, गया राम’चे राजकारणाला पूर्णविराम देऊन पंतप्रधान मोदी यांनी संपूर्ण बहुमताच्या सरकारच्या माध्यमातून सलग 10 वर्षं देशाला राजकीय स्थैर्य दिले आहे. या काळात मोदी यांनी भ्रष्टाचारमुक्त कारभार दिला. तेलंगणमधील भारत राष्ट्र समिती आणि काँग्रेसवर लाखो-कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप झाले, पण पंतप्रधानांवर साधा 25 पैशांच्या भ्रष्टाचाराचाही आरोप नाही, असे अमित शहा म्हणाले.

हेही वाचा – Sharad Pawar : संधी असतानाही सुप्रिया सुळेंना मंत्री केले नाही; मुलीबद्दल शरद पवार प्रथमच बोलले

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -