घरताज्या घडामोडीगोव्यात कार नदीत कोसळून भीषण अपघात; एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू

गोव्यात कार नदीत कोसळून भीषण अपघात; एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू

Subscribe

अंधार असल्याने कार सापडत नव्हती. गुरुवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास हे शोधकार्य संपले. ऑस्टिन फर्नांडिस, हेनरी आरावजो, प्रिसीला क्रूझ, ऑलविन आरावजो अशी मृतांची नावे आहेत.

वाढदिवस साजरा करण्यासाठी गोव्यात गेलेल्या चौघांचा बुडून मृत्यू झाला आहे. कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने कार नदीत कोसळली. बुधवारी मध्यरात्री ही घटना घडली. मात्र, अंधार असल्याने कार सापडत नव्हती. गुरुवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास हे शोधकार्य संपले. ऑस्टिन फर्नांडिस, हेनरी आरावजो, प्रिसीला क्रूझ, ऑलविन आरावजो अशी मृतांची नावे आहेत. (car accident in goa four death car drown into the river)

हेही वाचा – 31 जुलैला अर्जुन खोतकर शिंदे गटात प्रवेश करणार?

- Advertisement -

वाढदिवस साजरा करण्यासाठी एक कुटुंब गोव्यात गेलं होतं. वाढदिवस करून झाल्यानंतर रात्री उशिराने ते चारचाकी गाडीने घरी पतत होते. गाडी अत्यंत वेगात होती. त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले आणि ती गाडी थेट नदीत कोसळली. बुधवारी रात्री ही घटना घडल्याने मदतकार्यास उशीर झाला. हा अपघात इतका भीषण होता की झुआरी पुलाचा कठडा तुटून ही कार नदीत कोसळली. एकाच कुटुंबातील तिघेजण असून एकजण त्यांचा मित्र होता. त्यामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

हेही वाचा – देशात नव्या कोरोनाबाधितांचा आकडा स्थिरावला; मृत्यूदरात किंचित घट

- Advertisement -

बुधवारी मध्यरात्री हा प्रकार घडला. पोलीस आणि अग्निशमक दलाला ही माहिती मिळताच ते तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. अंधार असल्याने कार सापडत नव्हती. त्यामुळे दोन्ही पथकांनी अथक प्रयत्न केले. कार सापडल्यानंतर चार जणांचे मृतदेह सापडले.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -