घरCORONA UPDATEदेशात नव्या कोरोनाबाधितांचा आकडा स्थिरावला; मृत्युदरात किंचित घट

देशात नव्या कोरोनाबाधितांचा आकडा स्थिरावला; मृत्युदरात किंचित घट

Subscribe

काल ४४ रुग्णांचा उपचारांच्या दरम्यान मृत्यू झाल्याची नोंद झाली होती. आज ३२ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. त्यामुळे मृत्यूसंख्येतही किंचतशी घट झाल्याचं पाहायला मिळतंय. 

देशात कोरोनाबाधितांची नवी संख्या (New corona patient) अजूनही २० हजारांवर राहिली आहे. गेल्या काही दिवसांपासून २० हजारांच्या घरातच नव्या बाधितांची नोंद होत आहे. गेल्या २४ तासांत देशात २० हजार ४०९ नवे कोरोना रुग्ण सापडले आहेत. तर, ३२ जणांचा मृत्यू (Corona Death) झाला आहे. तसेच, सध्या देशात १ लाख ४३ हजार रुग्णांवर उपचार (Active Patients) सुरू आहेत.

हेही वाचा – निलंबनाविरोधात खासदारांचे 50 तासांचे आंदोलन, संसद भवनात मच्छरदाणी लावून झोपले खासदार

- Advertisement -

गेल्या २४ तासांत २२ हजार ६९७ रुग्णांनी कोरोनावर मात केली. नव्या बाधितांच्या संख्येपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने दिलासा मिळाला आहे. तसेच, काल ४४ रुग्णांचा उपचारांच्या दरम्यान मृत्यू झाल्याची नोंद झाली होती. आज ३२ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. त्यामुळे मृत्यूसंख्येतही किंचतशी घट झाल्याचं पाहायला मिळतंय.

सध्या देशात १ लाख ४३ हजार ९८८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अॅक्टिव्ह रुग्णांचा दर ०.३३ झाला आहे. बरे होण्याचं प्रमाण ९८.४८ टक्के तर, पॉझिटीव्हिटी दर ५.१२ टक्के आहे.

- Advertisement -

हेही वाचा – 5G स्पेक्ट्रमचा लिलाव उद्याही राहणार सुरू, 16 फेऱ्यांमध्ये 1,49,623 कोटी रूपयांची बोली

महाराष्ट्रातील आकडा २ हजारांवर स्थिरावला

महाराष्ट्रात गुरुवारी २२०३ नव्या बाधितांची नोंद झाली. तर २४७८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. महाराष्ट्रात तीन रुग्णंचा मृत्यू झाल्याचीही नोंद झाली. तर आतापर्यंत राज्यात ७८,७९,७६६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

आतापर्यंत २०३.६० कोटी लसींचे डोस देण्यात आले आहेत. यामध्ये ९३.२० कोटी दुसरा डोस असून ८.४५ बुस्टर डोस आहेत. गेल्या २४ तासांत ३८,६३,९६० लसी दिल्याची नोंद झाली आहे.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -