घरदेश-विदेश31 जुलैला अर्जुन खोतकर शिंदे गटात प्रवेश करणार?

31 जुलैला अर्जुन खोतकर शिंदे गटात प्रवेश करणार?

Subscribe

जालन्यातील शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर 31 जुलै रोजी शिंदे गटात प्रवेश करणार आहेत, असे सूत्रांनी सांगितले आहे. हा प्रवेश मुख्यमंत्री शिंदे यांच्या दौऱ्यात होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले

जालन्यातील शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर 31 जुलै रोजी शिंदे गटात प्रवेश करणार आहेत, असे सूत्रांनी सांगितले आहे. दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यापासून अर्जुन खोतकर शिंदे गटात कधी प्रवेश करणार याची चर्चा सुरु होती. मात्र, खोतकर यांनी जालन्यात माझा निर्णय जाहीर करेन असे सांगितले होते. मात्र, मुख्यमंत्री शिंदे यांच्या दौऱ्यात अर्जुन खोतकर शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. काही वेळापूर्वी अर्जुन खोतकर आणि अब्दुल सत्तार यांनी श्रीकांत शिंदे यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेत चर्चा केली होती.

अर्जुन खोतकर गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत आहेत. दिल्लीत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. तसेच त्यांनी भाजप नेते रावसाहेब दानवेंची भेट घेतली होती. आज त्यांनी खासदार श्रीकांत शिंदेंची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत आमदार अब्दुल सत्तार उपस्थित होते.

- Advertisement -

कट असेल तर कोणीही सेफ होण्याचा प्रयत्न करेल –

तीन दिवसापूर्वी वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांनी माझ्यावर काही संकट असतील तर चेहऱ्यावर तणाव दिसू शकतो. संकट असेल तर कोणीही सेफ होण्याचा प्रयत्न करेल. नाही त्या गोष्टींमध्ये जर अडचणी निर्माण केल्या जात असतील तर तणाव दिसणारच, असे ते म्हणाले होते.

- Advertisement -

ईडीच्या कारवाईमुळे शिंदे गटात? –

शिंदे गाटाच्या बंडानंतर अनेक आमदार आणि खासदार शिंदे गटात सहभागी होत आहेत. काही माजी आमदार आणि खासदार सुद्धा शिंदे गटात जात आहेत. जालना जिल्ह्यातील महत्वाचे नेते माजी आमदार अर्जुन खोतकर ईडीच्या कारवाईमुळे शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा आहे. मात्र खोतकर यांनी या अफवा असल्याचा खुलासा केला होता. तर मी अजूनही शिवसेनेत असून, फोटोवर अंदाज बांधू नका, असे खोतकर म्हणाले होते.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -