घरदेश-विदेशवेब सीरिजमधून शिव्या, सेक्स हद्दपार?

वेब सीरिजमधून शिव्या, सेक्स हद्दपार?

Subscribe

वेबसीरिजमधून आता शिव्या, सेक्स हद्दपार होणार का? असा सवाल आता विचारला जात आहे. कारण त्याविरोधात दिल्ली उच्चन्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे.

अरे, सेक्रेड गेम्स, गेम ऑफ थ्रोन्स पाहिलंस का? काय जबरदस्त स्टोरी आहे यार! सेक्रेड गेम्समधील गणेश गायतोंडेंच्या तोंडात असलेले कभी कभी लगता है अपूनही भगवान है! अशा एक ना अनेक डायलॉगची, वेब सीरिजची सध्या जोरात चर्चा सुरू आहे. तरूणाईच्या पसंतीला या सीरिज खूप मोठ्या प्रमाणात उतरल्याचं पाहायाला मिळत आहेत. पण या नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइम, हॉटस्टारवरील वेबसिरीज आणि चित्रपटांमधील अश्लीलता, संवाद आणि हिंसकतेविरोधात दिल्ली उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे. दिल्लीतील जस्टीस फॉर राईट्स फाऊंडेशन ही याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आता दिल्ली उच्च न्यायालयानं केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे. नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइमसह अन्य अॅप्सवर सध्या वेब सीरिजची चलती आहे. यामध्ये संवाद,सीन यामध्ये कोणतीही बंधन पाळली जात माहीत. यावर आता नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. त्यामुळे केंद्र यासंदर्भात नियमावली तयार करावी, अशी मागणी जस्टीस फॉर राईट्स फाऊंडेशननं केलेल्या याचिकेमध्ये करण्यात आली आहे. सेक्रेड गेम्स, गेम ऑफ थ्रोन्ससारख्या सीरीज अश्लील संवाद आणि हिंसक प्रसंग दाखवण्यात आले असल्याचे  याचिकेत म्हटले आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं यासंदर्भात नियमावली तयार करुन संबंधितांना निर्देश द्यावेत अशी मागणी  याचिकेद्वारे करण्यात आली आहे.

वाचा – ‘त्या’ वेबसीरिजवर न्यायालयाची नाराजी

त्यामुळे या प्रकरणामध्ये आता केंद्र सरकार आता भूमिका घेतं हे पाहावं लागणार आहे. वेबसीरिजविरोधात आता सेन्सॉरशिप लागणार का? हा देखील सवाल आता निर्माण झाला आहे. एकंदरीत या साऱ्या बाबी आता केंद्र सरकार काय उत्तर देतं यावर अवलंबून असणार आहे.

वाचा – सुजय डहाके यांच्या ‘सेक्स, ड्रग्ज & थिएटर’ वेबसीरिजची घोषणा

वाचा – ‘राजी’नंतर आता अमृता खानविलकर हिंदी वेबसीरिजमध्ये

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -