स्मृती इराणीलाही दीपवीरच्या लग्नाच्या फोटोची उत्सुकता

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनादेखील दीपवीरच्या लग्नाचे फोटो पाहण्याची उत्सुकता आहे. यासंबंधीची पोस्ट त्यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे.

Smruti Irani reached at Rashtriya Swayam Sevak Sangha office without security
केंद्रिय मंत्री स्मृती इराणी

अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण यांचा पारंपरिक कोंकणी पद्धतीने विवाह काल, १४ नोव्हेंबर रोजी संपन्न झाला, तर आज, १५ नोव्हेंबर रोजी त्यांचा सिंधी पद्धतीने लग्नसोहळा पार पडणार आहे. इटलीतील लेक कोमो येथे नयनरम्य व्हिलामध्ये हा सोहळा पार पडत आहे. काही मोजक्याच नातलगांच्या आणि मित्र मैत्रिणीच्या उपस्थितीत लग्न सोहळा पार पडला. ‘दीपवीर’च्या लग्नाचे काही खास फोटो पाहण्याची उत्सुकता जशी त्यांच्या चाहत्यांना आहे तशीच ती केंद्रीय मंत्री स्मृती इराणीलादेखील लागली आहे. त्यांनी या उत्सुकतेवर आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक मजेशीर पोस्ट शेअर केली आहे.

 

View this post on Instagram

 

#when you have waited for #deepveer #wedding #pics for too longgggg ?‍♀️

A post shared by Smriti Irani (@smritiiraniofficial) on

काय आहे त्या पोस्टमध्ये

स्मृती इराणी यांनी बागेतील बाकावर एक सांगाडा वाट पाहत बसला असल्याचा फोटो शेअर केला आहे. तसेच ‘जेव्हा तुम्ही ‘दीपवीर’च्या लग्नाचे फोटो पाहण्यासाठी फार काळ वाट पाहता…’, अशी फोटोखाली मजेशीर कॅप्शन दिली आहे. स्मृती इराणींच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. ‘दीपवीर’ चं लग्न अतिशय थाटामाटात झाले असून या लग्नाला प्रचंड सुरक्षा ठेवण्यात आली होती. लग्नातील कोणत्याही पाहुण्याला लग्न विधी अथवा लग्न परिसरातील कोणताही फोटो तसेच व्हिडिओ काढण्याची परवानगी नव्हती. दीपिका आणि रणवीरच्या लग्नाचे काही फोटो आणि व्हिडिओ ते स्वतःच त्यांच्या फॅन्ससाठी शेअर करणार असल्याचे म्हटले जात आहे.

फोटो लीग न होण्याची खबरदारी

वधूच्या पोशाखातील दीपिका आणि वराच्या पोशाखातील रणवीर पाहण्यासाठी चाहते आतूर झाले आहेत. पण हा सोहळा अतिशय खासगी ठेवण्यात आल्याने अद्याप इटलीतील या विवाह सोहळ्याचा एकही फोटो अद्याप बाहेर आलेला नाही. लग्नाचा एकही फोटो सोशल मीडियावर अपलोड न करण्याची अट पाहुण्यांपुढे ठेवण्यात आली आहे. अन्य कुणाच्याही हाती लग्नाचा एकही फोटो पडणार नाही, यासाठीही खास व्यवस्था करण्यात आली आहे.

वाचा : रिस्ट बँड, QR कोड; दीपिका-रणवीरच्या लग्नात सिक्युरिटी टाइट

वाचा : दीपिका परिधान करणार १ कोटीचे दागिने

वाचा : दीपिका-रणवीरने शाही लग्नसोहळ्याचा विमा उतरवला

वाचा : दीपवीरच्या लग्नाचे फोटो ते स्वतः करणार शेअर