घरदेश-विदेशया माजी पंतप्रधानांच्या बंगल्यात अमित शाह करणार वास्तव्य

या माजी पंतप्रधानांच्या बंगल्यात अमित शाह करणार वास्तव्य

Subscribe

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना एका माजी पंतप्रधानाचा बंगला सरकारी निवासस्थान म्हणून दिला जाणार आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा बंगला वास्तव्यासाठी दिला जाणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. सरकारी सुत्रांनुसार, अटलबिहारी वाजपेयी यांचा कृष्णा मेनन मार्गावरील बंगला अमित शहा यांच्या वास्तव्यासाठी तयार केला जात असून काम सुरु करण्यात आले आहे.

बंगल्याची केली पाहणी

माजी पंतप्रधानांचा कृष्णा मेनन मार्गावरील अधिकृत बंगला अमित शाह यांना दिला जात आहे, असी माहिती सरकारी सुत्रांनी पीटीआयशी बोलताना दिली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय गृहमंत्री पदासोबत भाजपाध्यक्षदेखील असणारे अमित शाह यांनी नुकतीच बंगल्याची पाहणी केली आहे. या पाहाणी दरम्यान, त्यांनी काही बदल देखील सुचवले आहेत. दरम्यान, त्यांनी सुचवलेल्या बदलानुसार काम देखील सुरु करण्यात आले आहे. तसेच येत्या एक ते दोन महिन्यात काम पूर्ण होईल असेही सुत्रांनी सांगितले आहे.

- Advertisement -

बंगल्याविषयी थोडक्यात

२००४ मध्ये सरकार सत्तेतून बाहेर पडल्यानंतर अटलबिहारी वाजपेयी कृष्णा मेनन मार्गावरील बंगल्यात वास्तव्यास गेले होते. जवळपास १४ वर्ष अटलबिहारी वाजपेयी यांनी आपल्या कुटुंबासोबत तिथे वास्तव्य केले होते. गतवर्षी ऑगस्ट महिन्यात अटलबिहारी वाजपेयी यांचे निधन झाल्यानंतर अटलबिहारी वाजपेंच्या कुटुंबाने नोव्हेंबर महिन्यात बंगला सोडला होता.


हेही वाचा – ‘अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण कश्मीरचा भूगोल बदलला तरी आश्चर्य वाटणार नाही’

- Advertisement -

हेही वाचा – अमित शहा दहशतवाद्यांचा खात्मा करणार; पदभार स्विकारल्यानंतर १० अतिरेकी रडारवर


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -