घरदेश-विदेशउद्धव ठाकरेंची चलो वाराणसी,चलो अयोध्याची घोषणा!!

उद्धव ठाकरेंची चलो वाराणसी,चलो अयोध्याची घोषणा!!

Subscribe

उद्धव ठाकरे यांनी चलो वाराणसी आणि चलो अयोध्याचा नारा दिला आहे. शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी चलो अयोध्या आणि चलो वाराणसीचे होर्डिंग्ज मातोश्री आणि शिवसेना भवन परिसरात लावले आहेत. त्यामुळे हे थेट भाजपला तर आव्हान नाही ना? याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगली आहे.

हिंदुत्वाच्या मुद्यावरून आता शिवसेना आक्रमक झाली असून उद्धव ठाकरे यांनी ‘चलो वाराणसी आणि चलो अयोध्या’ची घोषणा दिली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘मला वाराणसीला जाऊन गंगापूजन करायचे आहे आणि अयोध्येमध्ये जाऊन रामलल्लाचे दर्शन घ्यायचे आहे’, अशी घोषणा केली आहे. त्यानंतर शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी ‘चलो वाराणसी आणि चलो अयोध्या’चे आवाहन करणारी पोस्टर्स मातोश्री आणि शिवसेना भवन परिसरामध्ये लावली आहेत. याच होर्डिंगची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. ही होर्डिंग्ज म्हणजे शिवसेनेने हिंदुत्वाच्या मुद्यावर थेट भाजपला आव्हान दिले आहे. त्यामुळे आता भाजपची देखील गोची झाली आहे. शिवसेना आणि भाजपची युती ही हिंदुत्वाच्या विचारांवर आहे. भाजपने शिवसेनेला हिंदुत्व शिकवू नये असे देखील उद्धव ठाकरे यांनी यापूर्वी भाजपला सुनावले आहे. सामनातून देखील भाजपला आणि नरेंद्र मोदींना यापूर्वी वेळोवेळी लक्ष्य केले गेले आहे. त्यात आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाराणसी या मतदार संघामध्ये जाऊन उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदींना आव्हान देणार का? हे लवकरच स्पष्ट होईल.

थेट भाजपला आव्हान

वाराणसी हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मतदारसंघ! २०१४ सालच्या निवडणुकीमध्ये भाजपने गंगा शुद्धीकरण आणि अयोध्येमध्ये राम मंदीर उभारणीची घोषणा केली. पण, ४ वर्षानंतर देखील भाजपने या आश्वासनांची पूर्तता केलेली नाही. त्यात भाजप आणि शिवसेनेमधील मतभेद टोकाला पोहोचले असून दोन्ही मित्रपक्ष एकमेकांना पाण्यात पाहण्याची एकही संधी सोडत नाहीत. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकींसाठी शिवसेनेने स्वबळाचा नारा दिला आहे. पण, संभ्रम मात्र कायम आहे. राम मंदिर आणि गंगा शुद्धीकरणाच्या मुद्याचा भाजपने २०१४ सालच्या निवडणुकीमध्ये पुरेपूर वापर केला होता. पण आश्वासनांची पूर्तता अद्याप काही झालेला नाही. राम मंदिराचे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याचे सांगत भाजपने राम मंदिरावर संयमी भूमिका घेतली आहे. याच मुद्यांना पकडून शिवसेना आता भाजपला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न करणार आहे. उद्धव ठाकरे यांनी दिलेली वाराणसीतील गंगा दर्शनाची घोषणा आणि अयोध्येतील राम दर्शनाची घोषणा म्हणजे थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला दिलेले आव्हान आहे. अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.

- Advertisement -

युती नाहीच?

सन्मानाची वागणूक दिली जात नसल्याने नाराज शिवसेनेने एकला चलो चा नारा दिला. शिवसेनेची समजूत काढण्यासाठी अमित शहा यांनी मातोश्रीवारी करत बंद दाराआड उद्धव ठाकरे यांच्याशी अडीच तास चर्चा देखील केली. पण त्यानंतर देखील स्वबळाचा नारा शिवसेनेने कायम ठेवला आहे. पण, अद्याप तशा प्रकारची कोणतीही घोषणा उद्धव यांनी केली नसल्याने शिवसैनिकांमध्ये मात्र संभ्रम आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -