घरमनोरंजनरणबीरला 'संजू' पावला! मानधनात दुपटीने वाढ

रणबीरला ‘संजू’ पावला! मानधनात दुपटीने वाढ

Subscribe

'संजू' सिनेमाच्या भरघोस यशानंतर, रणबीर कपूरने त्याचं एका दिवसाचं मानधन ६ कोटी रुपये केल्याची चर्चा आहे.

अभिनेता रणबीर कपूर याची मुख्य भूमिका असलेला ‘संजू’ सिनेमा बॉक्सऑफिसवर चांगलाच गाजला. तुफान लोकप्रियता मिळवलेल्या संजू सिनेमाने ३०० कोटींचा टप्पा गाठला. सिनेमात संजय दत्तची मुख्य भूमिका साकारणाऱ्या अभिनेता रणबीर कपूरलाही या सिनेमामुळे चांगलाच फायदा झाला आहे. संजू सिनेमाच्या घवघवीत यशामुळे चॉकलेट बॉय रणबीर कपूरने त्याची ब्रँड व्हॅल्यू वाढवली असल्याचं समजतंय. रणबीर कपूरला सध्या मोठमोठ्या निर्मात्यांकडून सिनेमांच्या ऑफर्स येत असून, रणबीरनेही ही संधीचा फायदा घेत आपलं मानधन वाढवल्याचं समजत आहे. सध्या बी-टाऊनमध्ये सुरु असलेल्या चर्चेनुसार, रणबीरने त्याची ब्रँड एंडॉर्समेंट फी थेट दुप्पट केली आहे. उपलब्ध माहितीनुसार संजू चित्रपट येण्याआधी रणबीर साधारणत: ब्रँडच्या जाहिरातीसाठी ३ ते ३.५ कोटी इतके मानधन घ्यायचा. मात्र, आता संजूच्या यशानंतर त्याने ही फी दुप्पट केली असून, येत्या काळात तो ब्रँड एंडॉर्समेंटसाठी परडे ६ कोटी रुपये घेणार असल्याचं समजतंय.

रेकॉर्ड ब्रेक संजू

‘संजू’ सिनेमाची लाट देशभरात पसरली. संजू सिनेमाची आणि त्यातील रणबीर कपूरच्या अभिनयाची सगळीकडे जोरदार चर्चा आहे. प्रेक्षागृहात तूफान पसंती मिळत असलेल्या या सिनेमाने पहिल्याच दिवशी बक्कळ कमाई केली होती. इतकंच नाही तर दमदार कमाई करत संजूने एक नवा रेकॉर्डही बनवला. या रेकॉर्डनुसार संजू सिनेमाने चक्क बाहुबली-2 ला मागे टाकलं आहे. याआधी एका दिवसात सर्वाधिक कमाई करण्याचा रेकॉर्ड बाहुबली-२ या सिनेमाच्या नावावर होता.

घोडदौड सुरुच…

मोठ्या गाजावाजासह प्रदर्शित झालेल्या रणबीरच्या संजू चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक विक्रम रचले आहेत. पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाई करण्याचा रेकॉर्ड संजूने आपल्या नावावर केला आहे. प्रदर्शनानंतर पहिल्या ५ दिवसांत सिनेमाने जवळपास २०० कोटींची भरघोस कमाई केली होती. आजपर्यंत बॉक्सऑफिसवर जवळपास ३०० कोटींची कमाई केलेल्या ‘संजू’ चित्रपटाची घोडदौड अद्याप सुरुच आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -