घर देश-विदेश चंद्राच्या जवळ पोहोचले चांद्रयान-3 ; 17 ऑगस्टला घेणार मोठी झेप

चंद्राच्या जवळ पोहोचले चांद्रयान-3 ; 17 ऑगस्टला घेणार मोठी झेप

Subscribe

17 ऑगस्टचा दिवस मिशनसाठी महत्त्वाचा असेल कारण या दिवशी चांद्रयान-3 चे प्रोपल्शन मॉड्यूल लँडरपासून वेगळे केलं जाईल. यानंतर 23 ऑगस्ट रोजी चांद्रयान-3 चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार आहे, ज्यावर संपूर्ण जगाचे लक्ष लागलेलं आहे. 

इस्रोची चांद्रयान-3 मोहीम ही आपल्या गंतव्यस्थानाच्या अगदी जवळ पोहोचली आहे. इस्रोने आज माहिती दिली की चांद्रयान-3 ने चंद्राच्या कक्षेतील आणखी एक टप्पा यशस्वीरित्या पूर्ण केला आहे आणि आता तो चंद्राच्या जवळच्या कक्षेत पोहोचला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, चांद्रयान-3 ने आता चंद्राच्या चौथ्या कक्षेत प्रवेश केला आहे. ( ISRO Chandrayaan 3 reaches near the moon A big leap to take on August 17 )

आता किमान 150 किमी बाय कमाल 1747 किमी कक्षेत ते फिरणार आहे. चंद्राच्या जवळ जाणाऱ्या चांद्रयान-3 ला आज एक महिना पूर्ण झाला आहे. 14 जुलैला चांद्रयान-3 आंध्रप्रदेशातील श्रीहरिकोटा येथून चंद्राकडे रॉकेटच्या सहाय्यानं झेपावलं होतं. आता 9 दिवसांनंतर 23 ऑगस्टला चांद्रयान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करणार आहे. त्याआधी चांद्रयानाने अनेक पायऱ्या यशस्वी केल्या आहेत.

चांद्रयान-३ चंद्राच्या जवळ पोहोचलं

- Advertisement -

इस्रोने सांगितले की, चांद्रयान-3 चे थ्रस्टर 14 ऑगस्ट रोजी सकाळी 12:45 वाजता सक्रिय झाले होते, ज्याच्या मदतीने चांद्रयान-3 ने आपली कक्षा यशस्वीरित्या बदलली आहे. 5 ऑगस्ट रोजी चांद्रयान-3 ने प्रथमच चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला आणि तेव्हापासून ते तीन वेळा आपली कक्षा बदलून चंद्राच्या जवळ आले आहे. चांद्रयान-3 चंद्रापासून 150 किमी अंतराच्या कक्षेत 1900 किमी प्रति सेकंद या वेगाने प्रवास करत आहे. चांद्रयानाचा परिभ्रमण टप्पा सुरू आहे आणि चांद्रयान-3 लंबवर्तुळाकार कक्षेतून वर्तुळाकार कक्षेत येऊ लागला आहे.

17 ऑगस्ट ही महत्वाची तारीख

16 ऑगस्ट रोजी चांद्रयान-3 आणखी एक कक्षा कमी करून चंद्राच्या जवळ येईल. त्याच वेळी, 17 ऑगस्टचा दिवस मिशनसाठी महत्त्वाचा असेल कारण या दिवशी चांद्रयान-3 चे प्रोपल्शन मॉड्यूल लँडरपासून वेगळे केलं जाईल. यानंतर 23 ऑगस्ट रोजी चांद्रयान-3 चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार आहे, ज्यावर संपूर्ण जगाचे लक्ष लागलेलं आहे.

- Advertisement -

चांद्रयान-3 मिशनमध्ये लँडर, रोव्हर आणि प्रोपल्शन मॉड्यूलचा समावेश आहे. लँडर आणि रोव्हर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरतील आणि 14 दिवस चंद्राचा अभ्यास करणार आहेत. दुसरीकडे, प्रोपल्शन मॉड्यूल चंद्राच्या कक्षेत राहून चंद्राच्या पृष्ठभागावरुन येणाऱ्या किरणांचा अभ्यास करेल. या मोहिमेद्वारे इस्रो चंद्राच्या पृष्ठभागावरील पाण्याचा शोध घेईल आणि चंद्राच्या पृष्ठभागावर भूकंप कसे होतात हे देखील कळेल.

( हेही वाचा: PM Modi Speech : पंतप्रधानाच्या मंगळवारच्या संबोधनाकडे देशवासीयांचे लक्ष; काय करणार यावेळी घोषणा? )

 

- Advertisment -