घर उत्तर महाराष्ट्र दरनियंत्रणासाठी केंद्राचे आयात धोरण; टोमॅटो उत्पादक शेतकर्‍यांच्या अपेक्षांवर फेरले पाणी

दरनियंत्रणासाठी केंद्राचे आयात धोरण; टोमॅटो उत्पादक शेतकर्‍यांच्या अपेक्षांवर फेरले पाणी

Subscribe

नाशिक :  टोमॅटोला मिळालेल्या अनपेक्षित दरांमुळे राज्यातील शेकडो शेतकरी मालामाल झाले असताना, कांदा उत्पादक शेतकर्‍यांनाही भरघोस आर्थिक उत्पन्नाची आस लागली होती. मात्र, केंद्र सरकारने दरनियंत्रणासाठी नेपाळमधून टोमॅटो आयातीचा, तर नाफेड आणि एनसीसीएफने खरेदी केलेला कांदा नाफेडमार्फत बाजारपेठेत आणण्याची तयारी करत बळीराजाच्या अपेक्षांवर पाणी फेरले आहे.

टोमॅटोला दीडशे-दोनशे रुपये दर मिळाल्याने उत्पादक मालामाल झाले असले तरीही, ग्राहक मात्र दर घसरण्याच्या प्रतिक्षेत आहेत. त्यातच आता केंद्र सरकारने दरनियंत्रणासाठी थेट नेपाळमधून टोमॅटोची आयात करण्याचा निर्णय घेतल्याने टोमॅटोची काढणी सुरू असलेल्या शेतकर्‍यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

- Advertisement -

देशात टोमॅटोच्या दरांनी उच्चांक गाठला असल्याने केंद्र सरकारने टोमॅटो आयात करुन दरनियंत्रणाचे प्रयत्न सुरु केले आहेत. त्याचाच भाग म्हणून नेपाळमधून टोमॅटोची पहिली खेप भारतात दाखल झाली आहे. आयात केलेले टोमॅटो उत्तर भारतातील वाराणसी, लखनऊ आणि कानपूर शहरात टप्याटप्याने दाखल होत आहेत. घाऊक बाजारपेठेत टोमॅटोच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. तीन महिने उलटूनदेखील टोमॅटोचे दर कायम आहेत.

सध्या शहरासह जिल्ह्यातील बाजारपेठेत ४५ ते ७० रुपये किलो दराने टोमॅटो ग्राहकांना मिळत आहेत. काही ठिकाणी मुसळधार तर काही भागांत तुरळक पाऊस, टोमॅटोचे घटलेले उत्पादन, मागणी आणि पुरवठा यातील तफावत यामुळे गेल्या तीन महिन्यांपासून टोमॅटोच्या दरांत विक्रमी वाढ झाली आहे. टोमॅटोसोबतच तृणधान्ये, डाळींच्या किंमतीतही वाढ झाली आहे. भाज्यांच्या दरात लक्षणीय वाढ होत आहे. जून व जुलै महिन्यात टोमॅटोच्या दरात लक्षणीय वाढ झाली आहे. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक बजेट मात्र कोलमडले आहे.

वातावरणासह विषाणूंचा टोमॅटोवर परिणाम

- Advertisement -

अवकाळी पाऊस, तापमानात अचानक होणारी वाढ आणि पिकांवरील विषाणूंचा प्रादुर्भाव याचा टोमॅटो उत्पादनावरही मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे अनेक शेतकर्‍यांचे टोमॅटोचे उभे पीक वाया गेले आहे. परिणामी टोमॅटो उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला होता. ज्या शेतकर्‍यांनी प्रतिकूल वातावरणातही पीक जपले त्यांना मात्र लॉटरी लागली. वाढत्या दरांनी अशा अनेक शेतकर्‍यांना मालामाल करत त्यांची स्वप्नपूर्ती केली आहे.

- Advertisment -