घरताज्या घडामोडीकाँग्रेसने आता अरविंद केजरीवालांनाच आपला नेता मानावं; चेतन भगत यांचा सल्ला

काँग्रेसने आता अरविंद केजरीवालांनाच आपला नेता मानावं; चेतन भगत यांचा सल्ला

Subscribe

चेतन भगत यांनी काँग्रेस नेत्यांना सल्ला दिला आहे की, 'अरविंद केजरीवाल यांना आपला नेता असल्याचे त्यांनी समजावे'

संपुर्ण देशाचे लक्ष असलेल्या दिल्ली विधानसभेचे निकाल जाहीर होत आहेत. पुन्हा एकदा दिल्लीत आपचे सरकार आल्याने भाजपला यावेळेस देखील पराजय स्वीकारावा लागला आहे. दिल्ली विधानसभेच्या निकालावरून अनेकजन आपली प्रतिक्रीया देताना दिसत आहेत. लेखक चेतन भगत यांनी देखील दिल्ली विधानसभेवर आपली प्रतिक्रीया व्यक्त केली आहे. लेखक म्हणून आपला ठसा उमटवणारे चेतन भगत यांनी लिहीलेल्या पुस्तकांवर आजपर्यंत अनेक चित्रपटांची देखील निर्मिती झाली आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे दुसऱ्यांदा सपशेल पानिपत झाल्यानंतर चेतन भगत यांनी काँग्रेस नेत्यांना सल्ला दिला आहे की, ‘अरविंद केजरीवाल यांनाच आपला नेता मानावे’

- Advertisement -

दिल्ली विधानसभेच्या निकालावरून चेतन भगत यांनी काँग्रेसला लक्ष्य करत निशणा साधला आहे. ‘देशभरातील काही काँग्रेस नेते हे अरविंद केजरीवाल यांनाच आपला नेता का समजत नाहीत? काँग्रेसने आतापर्यंत एकही जागा मिळवलेली नाही याहून अधिक काय होऊ शकतं? आपण नेमके कुठे जात आहोत? या विषयी किमान आपण विचार करावा’. अशा स्पष्ट शब्दात चेतन भगत यांनी काँग्रेसवर निशाना साधत, काँग्रेस नेत्यांनी केजरीवाल यांचा नेता म्हणून स्वीकार करावा, असा सल्ला ट्विटरच्या माध्यमातून दिला आहे.

प्रकाश राज यांचा टोला

दिल्ली विधानसभा निवडणुकी संदर्भात बॉलिवूडमधून देखील अनेक प्रतिक्रिया येत आहेत. या आधी बॉलिवूड अभिनेते प्रकाश राज यांनी आपली प्रतिक्रीया ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. ‘कॅपिटल पनिशमेंट… गोली मारने वालों को झाडूं से मारा शॉक लगा???’ अशा शब्दात त्यांनी भाजपला लक्ष्य केल्याचे दिसत आहे.

- Advertisement -

आपने २०१५ च्या निवडणुकीत ७० पैकी ६७ जागा पटकावत विजय मिळवला होता. मागील वर्षी भाजपला केवळ तीन जागांवर समाधान मानावे लागले होते, तर काँग्रेस एकही जागा मिळवू शकले नव्हते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -