घरताज्या घडामोडीबिहारमध्ये पंचायतीच्या निवडणुकीमध्ये गहू-तांदळानंतर आता चिकन आणि पुलावचा बेत, डीएम आणि एसपीची...

बिहारमध्ये पंचायतीच्या निवडणुकीमध्ये गहू-तांदळानंतर आता चिकन आणि पुलावचा बेत, डीएम आणि एसपीची धाड

Subscribe

मुख्य आरोपी इलेक्शन एजन्टला अटक..

बिहारमध्ये पंचायतीच्या निवडणुकीमध्ये (Bihar Panchayat Election 2021) अनेक वेळा आचार संहितेचं उल्लंघन करण्यात आलंय. नालंदा जिल्ह्यामध्ये प्रत्येक मतदाराला मासे आणि भात अशा प्रकारचा बेत दिला जायचा. परंतु गहू-तांदूळ आणि मासे-भातनंतर आता चिकन आणि पुलाव खाण्यासाठी देण्यात आलं आहे. जिल्ह्यातील मतदाराचा फायदा घेण्यासाठी किंवा गैरफायदा घेत वाढदिवसाच्या निमित्ताने ५ हजारांपेक्षा जास्त लोकांना चिकन-पुलाव खाण्यासाठी बोलावण्यात आलं. त्यानंतर हे प्रकरण उघड होताच मुख्य आरोपी इलेक्शन एजन्टला अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बिहार पंचायत निवडणुकीमध्ये प्रचार-प्रसार आणि मतदाराला लाच दाखवण्याचं काम हे इलेक्शन एजन्टकडून सुरू होतं. येथील उमदेवारीसाठी उभी असलेल्या राज कुमारी यांनी इलेक्शनच्या एजन्टला आपल्या वाढदिवसाला बोलावलं. हा वाढदिवस बुधवारी होता. एजन्टसह संपूर्ण परिसरातील लोकांना राज कुमारी यांनी जेवणासाठी आमंत्रण दिलं होतं. परंतु वाढदिवसाची माहिती जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना मिळताच डीएम (DM)आणि एसपी (SP) यांनी संधीचा फायदा घेत त्यांच्यावर धाड टाकली.

- Advertisement -

५ हजारांपेक्षा जास्त लोकांनी लावली हजेरी

प्रदीप सिंह यांच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त जवळपास ५ हजारांपेक्षा जास्त लोकांनी हजेरी लावली होती. चिकन आणि पुलाव हे खाण्यासाठी देणार असल्याची माहिती त्यांना मिळाली. प्रत्येकाला जेवण्यासाठी आमंत्रित करण्यात आलं होतं. त्यानंतर लोकं चिकन आणि पुलाव खात होते. परंतु डीएम आणि एसपीने तिथे पोहोचून यावर छापेमारी केली. त्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.

मागील काही दिवसांमध्ये सकरॉल पंचायतीचे तत्कालीन पंचायत प्रमुख निशा भारती आणि त्यांच्या समर्थकांनी मतदारांना हॉटेलमध्ये मासे आणि भाताचा आयोजन केलं होतं. पंचायतीच्या प्रमुखाने जवळपास २ क्विंटलपेक्षा जास्त मच्छी मागवली होती. त्यानंतर एक हजारपेक्षा जास्त लोकांनी येथे उपस्थिती दर्शवली होती. परंतु पोलिसांना सुद्दा या गोष्टीची माहिती मिळताच त्यांनी यावर छापा टाकला आणि सर्व सामान जप्त केलं.

- Advertisement -

गहू आणि तांदूळ वाटप

भोजपूर जिल्ह्यातील चरपोखरीच्या मझिआव आणि अररिया जिल्ह्यामध्ये गहू आणि तांदळाचं फ्रीमध्ये वाटप करण्यात आलं होतं. त्यानंतर लोकं मोठ्या प्रमाणात आकर्षित झाली होती. मात्र, या गोष्टीची माहिती मिळताच पीडीएस डीलरवर प्रशासनाकडून मोठी कारवाई करण्यात आली होती.


हेही वाचा: महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या अध्यक्षपदी डॉ. वजाहत मिर्झा यांची बिनविरोध


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -