घरताज्या घडामोडीमध्य रेल्वे हिवाळी-ख्रिसमस दरम्यान ४२ विशेष सेवा चालवणार

मध्य रेल्वे हिवाळी-ख्रिसमस दरम्यान ४२ विशेष सेवा चालवणार

Subscribe

हिवाळी /ख्रिसमस २०२१ मध्ये प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे मुंबई /पुणे – थिवि /करमळी दरम्यान ४२ विशेष रेल्वे सेवा चालवणार आहे. या विशेष याआधी घोषित केलेल्या १४ विशेष सेवांव्यतिरिक्त आहे. तपशील खालीलप्रमाणे:-

(१) दादर – थिवि द्वि-साप्ताहिक विशेष (१० सेवा)

- Advertisement -

०१२८७  द्वि-साप्ताहिक विशेष १८ डिसेंबर २०२१ ते १ जानेवारी २०२२ (५ सेवा) पर्यंत दादर येथून दर बुधवार आणि शनिवारी ००.३५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी १३.०० वाजता थिवि येथे पोहोचेल.

०१२८८ द्वि-साप्ताहिक विशेष  २० डिसेंबर २०२१ ते ३ जानेवारी २०२२ (५ सेवा) पर्यंत थिवि येथून दर गुरुवार आणि सोमवारी १३.३० वाजता सुटेल आणि दादर येथे दुसऱ्या दिवशी ००.२० वाजता पोहोचेल.

- Advertisement -

थांबे : ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडावली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड.

संरचना : १ प्रथम वातानुकूलित, १ प्रथमसह द्वितीय वातानुकूलित, २ तृतीय वातानुकूलित, ४ शयनयान, ३ द्वितीय श्रेणी चेअर कार आणि ६ द्वितीय आसन श्रेणी.

(२) पनवेल – थिवि त्रि-साप्ताहिक विशेष (१६ सेवा)

०१२८९ त्रि-साप्ताहिक विशेष  १९ डिसेंबर २०२१ ते ३ जानेवारी २०२२ (८ सेवा) पर्यंत पनवेल येथून दर सोमवार, गुरुवार आणि रविवारी ००.१५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी १३.०० वाजता थिवि येथे पोहोचेल.

०१२९० त्रि-साप्ताहिक विशेष १८ डिसेंबर  २०२१ ते २ जानेवारी २०२२ (८ सेवा) पर्यंत थिवि येथून दर बुधवार, शनिवार आणि रविवार १३.३० वाजता सुटेल आणि पनवेल येथे त्याच दिवशी २२.४५ वाजता पोहोचेल.

थांबे : रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी,अडावली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड.

संरचना : १ प्रथम वातानुकूलित, १ प्रथमसह द्वितीय वातानुकूलित, २ तृतीय वातानुकूलित, ४ शयनयान, ३ द्वितीय श्रेणी चेअर कार आणि ६ द्वितीय आसन श्रेणी.

(३) पुणे – करमळी साप्ताहिक विशेष (८ सेवा)

01291 विशेष साप्ताहिक १७ डिसेंबर २०२१ ते ७ जानेवारी २०२२ (४ सेवा) पर्यंत पुणे येथून दर शुक्रवारी १७.३० वाजता सुटेल (४ सेवा) आणि करमळी येथे दुसऱ्या दिवशी ०६.०० वाजता पोहोचेल.

01292 विशेष साप्ताहिक  १९डिसेंबर२०२१ ते ९ जानेवारी २०२२ (४ सेवा) पर्यंत करमळी येथून दर रविवारी ०९.२० वाजता सुटेल आणि पुणे येथे त्याच दिवशी २३.५० वाजता पोहोचेल.

थांबे: लोणावळा, कल्याण, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडावली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिवि.

संरचना : १ द्वितीय वातानुकूलित, ४ तृतीय वातानुकूलित, ११ शयनयान आणि ६ द्वितीय आसन श्रेणी.

(४) पनवेल – करमळी साप्ताहिक विशेष (८)

01293 विशेष साप्ताहिक १८ डिसेंबर  २०२१ ते ८ जानेवारी २०२२ (४ सेवा) पर्यंत पनवेल येथून दर शनिवारी २२.०० वाजता सुटेल आणि करमळी येथे दुसऱ्या दिवशी ०६.०० वाजता पोहोचेल.

01294 विशेष साप्ताहिक १८डिसेंबर २०२१ ते ८ जानेवारी २०२२ (४ सेवा) पर्यंत करमळी येथून दर शनिवारी ०९.२० वाजता सुटेल आणि पनवेल येथे त्याच दिवशी २०.०० वाजता पोहोचेल.

थांबे : रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडावली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिवि.

संरचना : १ द्वितीय वातानुकूलित, ४ तृतीय वातानुकूलित, ११ शयनयान आणि ६ द्वितीय आसन श्रेणी.

आरक्षण : वरील पूर्णत: आरक्षित विशेष गाड्या क्रमांक 01287, 01289, 01291 आणि 01293 साठी विशेष शुल्कासह बुकिंग २८ नोव्हेंबर २०२१ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरु होईल.

या विशेष गाड्यांच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES अ‍ॅप डाउनलोड करा.

फक्त कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांनाच बोर्डिंग, प्रवास आणि गंतव्यस्थानी कोविड-१९ शी संबंधित सर्व नियमांचे पालन करून या विशेष ट्रेनमध्ये चढण्याची परवानगी दिली जाईल.


हे ही वाचा – राज्यात २७ हजार १३८ सहकारी संस्थांच्या निवडणुका होणार, प्राधिकरण आयुक्तांची घोषणा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -