घरदेश-विदेशगर्लफ्रेंड सोबत रंगेहाथ सापडला; पिंजऱ्यात बंद करून नदीत फेकला

गर्लफ्रेंड सोबत रंगेहाथ सापडला; पिंजऱ्यात बंद करून नदीत फेकला

Subscribe

नदीत फेकल्यामुळे या व्यक्तीला गंभीर दुखापत झाली. जखमी झालेल्या व्यक्तीला उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले.

एका विवाहित पुरुषाला पिंजऱ्यात कैद करुन नदीत फेकण्याचा धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. या विवाहित पुरूषाला त्याच्या प्रेयसीसह रंगेहाथ पकडल्या नंतर त्याला अशाप्रकारची कठोर शिक्षा देण्यात आली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या घटनेसंदर्भात पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेतले आहे.

आपल्या प्रेयसीची फसवणूक करताना पकडल्यानंतर एका युवकाला नदीत फेकून दिले. ही घटना चीनची असून प्राचीन काळात विवाहबाह्य संबंध ठेवणाऱ्या लोकांना अशाच प्रकारची शिक्षा दिली जायची. यासंदर्भातील या घटनेतील व्यक्तीला पिंजऱ्यात कैद करून नदीत फेकले. यामुळे पिडित व्यक्तीचा मृत्यू झाला. यासह डेली मेलमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, आपल्या प्रेयसीची फसवणूक करणारी व्यक्ती नको त्या अवस्थेत होती. तेथील लोकांनी त्याला रंगेहाथ पकडले. या प्रकारानंतर त्याला बांबूच्या पिंजऱ्यात ठेवण्यात आले आणि जमलेल्या लोकांनी त्याला दोरीने बांधले.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना शुक्रवारी चीनच्या उत्तरेकडील माओमिंग शहरातील आहे. असे सांगितले जात आहे की, आपल्या प्रेयसीसह रंगेहाथ आढळल्यानंतर त्याला पिंजऱ्यात बंद करून नदीन फेकून देण्यात आले. मात्र काही वेळानंतर या व्यक्तीला नदीतून बाहेर काढण्यात आले. त्यामुळे त्याचा जीव वाचला. मात्र नदीत फेकल्यामुळे या व्यक्तीला गंभीर दुखापत झाली. जखमी झालेल्या व्यक्तीला उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान या घटनेसंदर्भात पोलिसांचा तपास सुरू आहे.


‘ही’ स्वदेशी लस सरकारसाठी २५० रुपयांत मिळणार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -