घरमुंबईईडीच्या धाडी, छापेमारी सगळ सत्तेसाठीच चाललयं - सचिन सावंत

ईडीच्या धाडी, छापेमारी सगळ सत्तेसाठीच चाललयं – सचिन सावंत

Subscribe

भाजपचा देशातला पॅटर्न आता राज्यातही

भाजपचे दाखवण्याचे दात वेगळे आणि खाण्याचे वेगळे आहेत. त्यांचा डोळा सत्तेकडे लागला आहे. या सगळ्या धाडी आणि छापेमारीच सत्र हे सत्तेसाठीच चालल आहे. देशात सर्वत्र अशा धाडी टाकण्यात आल्या आहेत, तोच पॅटर्न आता महाराष्ट्रात वापरण्यात येत आहे, अशी टीका कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी अंमलबजावणी संचालयनाने शोधमोहीम हाती घेतली आहे. यावर कॉंग्रेसमार्फत प्रतिक्रिया मांडण्यात आली आहे. गेल्या सहा वर्षात एकातरी भाजपा नेत्याच्या घरावर ईडीने छापा टाकाला का ? असा सवाल कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.

विरोधकांना नेस्तनाबूत करण्यासाठी भाजपा असे घाणेरडा डाव खेळत आहे. अशा कृत्यांमुळेच लोकशाही धोक्यात आहे. मला यानिमित्ताने प्रश्न पडतो की भाजप नेत्यांना एकही नोटीस पाठवण्यात येत नाही. त्यामुळे आपला तो बाब्या आणि दुसऱ्याच ते कार्ट. भाजपवाल्यांकडेही कोट्यावधींची संपत्ती आहे, मग त्यांची चौकशी का होत नाही असा सवाल त्यांनी केला आहे. सुशांतसिंह राजपुत प्रकरणात ईडी आली कशी ? त्याचा पैसा हा चोरीचा, मनी लॉंड्रिंगचा होता का ? भाजपचा हा दांभिकपणा लपून राहिलेला नाही. भाजपा जेव्हा विरोधात होते, तेव्हा दरेकरांचा मुंबै बॅंक घोटाळा, विजय गावित यांच्यावरही घोटाळ्याचे आरोप झाले. पण हेच नेते जेव्हा भाजपमध्ये आले तेव्हा मात्र गंगाजल टाकून पवित्र करून भाजपमध्ये घेण्यात आले, असे सांगत त्यांनी सावंत यांनी ईडीच्या कारवाईवरून भाजपावर निशाणा साधला आहे.

- Advertisement -

भाजपा हीन पातळीच राजकारण करणारा पक्ष आहे. लोकांनी चिंतन करण्याची वेळ आली आहे. ज्यांना निवडून दिलयं ते लोकशाहीवर घाला करत आहे. द्वेष बुद्धीने छापे टाकण्याचे आजच्या कारवाईच्या निमित्ताने समोर आले आहे. भाजप नेत्यावर एकही छापा पडत नाही किंवा एकही नोटीस जात नाही, असे का होत असा सवाल सचिन सावंत यांनी केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -