घरदेश-विदेशवैयक्तिक सुरक्षा नाकारून मुक्तपणे वावरणारे राष्ट्रपती!

वैयक्तिक सुरक्षा नाकारून मुक्तपणे वावरणारे राष्ट्रपती!

Subscribe

मेक्सिकोच्या नव्या राष्ट्रपतींनी स्वत:साठी अंगरक्षक नेमण्यास नकार दिला आहे. आपली सुरक्षा जनतेने घ्यावी, अशी त्यांची इच्छा आहे.

देशाचे राष्ट्रतीपद म्हणजे सर्वोच्च पद मानले जाते. त्यामुळे राष्ट्रपतींना देखील तितकीच सुरक्षा असणे गरजेचे आहे. म्हणूनच प्रशासनाडून विशेष सुरक्षाव्यवस्था राष्ट्रपतींसाठी तैनात असते. मात्र, मेक्सिकोच्या नव्या राष्ट्रपतींनी स्वत:साठी अंगरक्षक नेमण्यास नकार दिला आहे. आपली सुरक्षा जनतेने घ्यावी, अशी त्यांची धारणा आहे. त्यामुळे त्यांनी स्वयं रक्षणासाठी अंगरक्षक नाकारला आहे.

निवडणुकीदरम्यान मेक्सिकोत आराजकता

बऱ्याच दिवसांपासून चर्चेत असणाऱ्या मेक्सिकोच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. या निवडणुकीदरम्यान, मेक्सिकोमध्ये प्रचंड आराजकता माजली होती. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कित्येक उमेदवारांची हत्या देखील करण्यात आली. अखेर या मृत्यू तांडवाचा अंत होऊन मेक्सिकोमध्ये डाव्या विचारसरणीच्या पक्षाची सत्ता स्थापन झाली. अँड्रेस मॅनुअल लोपेज ऑब्राडोर हे मेक्सिकोचे नवे राष्ट्रपती झाले. सत्तेत येताक्षणीच त्यांनी स्वत:च्या संरक्षणासाठी अंगरक्षकाची आवश्यकता नसल्याचे सांगितले आहे. ‘आपल्या सुरक्षेची काळजी जनतेने घ्यावी’, असं त्यांचं मत आहे. शिवाय, आपण जनतेचाच एक भाग असल्यामुळे अशा सुविधांपासून लांब राहिलो तर जनतेसोबत आपले नाते जास्त दृढ होईल, अशीही त्यांची भावना आहे.

- Advertisement -

ऑब्राडोर यांचे लोकप्रिय आश्वासने

अँड्रेस मॅनुअल लोपेज ऑब्राडोर यांनी निवडणुकीआधी दिलेली काही लोकप्रिय आश्वासने

राष्ट्रपती भवनात राहणार नाही – अँड्रेस मॅनुअल लोपेज ऑब्राडोर यांनी प्रचारादरम्यान राष्ट्रपती म्हणून निवडून आल्यावर राष्ट्रपती भवनात राहणार नाही, असे सांगितले होते. ते स्वत:च्या राहत्या घरुनच राष्ट्रपती पदाची धुरा सांभाळणार आहेत. त्यांनी मेक्सिकोच्या लोकांना आश्वासन दिले की, राष्ट्रपती भवनाचे रुपांतर लवकरच कला केंद्रात केले जाईल.

- Advertisement -

सरकारी अधिकाऱ्यांचे वेतन कमी करणार – अँड्रेस मॅनुअल लोपेज ऑब्राडोर स्वत:चे वेतन निम्म्याने कमी करणार आहेत. त्याचबरोबर प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे वेतन कमी करणार आहेत. तर दुसरीकडे काबाडकष्ट करणाऱ्या गरीब अधिकाऱ्यांचे पगार ते वाढवणार असल्याचे त्यांनी घोषित केले आहे.

निम्म्यापेक्षा जास्त लोकांची मते त्यांना मिळाली

अँड्रेस मॅनुअल लोपेज ऑब्राडोर यांना ‘अम्लो’ नावानेही ओळखले जाते. ते एक डिसेंबरला राष्ट्रपती पदाची शपथ घेणार आहेत. मेक्सिकोच्या एकूण लोकसंख्येपैकी ५३ टक्के लोकांनी अम्लो यांना मतदान केले आहे. मेक्सिकोच्या इतिहासात असे पहिल्यांदा घडले आहे की, जिंकून येणाऱ्या उमेदवाराला देशातील निम्म्यापेक्षा जास्त लोकांनी मतदान केले आहे. अम्लो यांनी विद्यमान अध्यक्ष अॅनरिक पेना निअॅटो यांची भेट घेतली. त्यांनी त्या भेटीदरम्यान निअॅटो यांना सांगितले की, ‘मला अंगरक्षकाची आवश्यकता नाही, याचा अर्थ जनता माझी काळजी घेईल आणि सुरक्षा करेल’.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -