घरदेश-विदेशगांधी कुटुंबाचं राष्ट्रीय हितासाठी योगदान नाही - स्मृती इराणी

गांधी कुटुंबाचं राष्ट्रीय हितासाठी योगदान नाही – स्मृती इराणी

Subscribe

वर्षानुवर्षे सत्ता राहिलेल्या कुटुंबाचे देशहितासाठी कोणतंही योगदान नाही, असं विधान केंद्रीय वस्त्रोद्योग आणि महिला विकास मंत्री स्मृती इराणी यांनी केलं आहे.

केंद्रीय वस्त्रोद्योग आणि महिला विकास मंत्री स्मृती इराणी यांनी गांधी कुटुंबाला लक्ष्य केलं आहे. गांधी कुटूंबाचं राष्ट्रीय हितासाठी कोणतंही योगदान नाही, असा आरोप स्मृती इराणी यांनी केला आहे. कांगडा लोकसभा मतदारसंघाच्या वर्च्युअल मेळाव्याला संबोधित करताना त्यांनी हे विधान केलं आहे. यावेळी त्यांनी देशातील जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ऐतिहासिक आशीर्वाद दिला, असं म्हणाल्या.

एकाच कुटुंबात वर्षानुवर्षे सत्ता राहिली. देशहितासाठी या कुटुंबाचे कोणतेही योगदान नाही. जेव्हा देशाला नवीन दिशा दिली जात आहे, तेव्हा त्यांना या गोष्टीचा त्रास होत आहे, असं केंद्रीय वस्त्रोद्योग आणि महिला विकास मंत्री स्मृती इराणी म्हटलं. हिमाचल येथे भाजपचा व्हर्च्युअल मेळावा पार पडला. यावेळी स्मृती इराणी यांनी गांधी कुटुंबावर आरोप केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – चोवीस तासांत गुजरात दुसऱ्यांदा हादरलं, ४.६ तीव्रतेचा पुन्हा भूकंप


हिमाचल प्रदेश केवळ देवाची भूमी नव्हे तर एक वीर भूमी आहे. राज्याच्या अनेक वीरांनीही देशाच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या माजी सैनिकांच्या वन रँक वन पेन्शनचा प्रश्नही मोदी सरकारने सोडवला. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी पुढे म्हणाल्या, भूतकाळ विसरुन जाऊया, कारण विकासाचा नवा टप्पादेखील सर्वांसमोर आहे. कोरोना हे केवळ भारतच नव्हे तर जगासाठी एक मोठे आव्हान होते, परंतु मोदींच्या नेतृत्वात केंद्र सरकारने ही परिस्थिती हाताळली. कोरोनाकाळात आणि त्यानंतरचं अर्थव्यवस्थेचं नुकसान हाताळण्यासाठी मोदी सरकारने कोट्यावधी रुपयांचे पॅकेजही दिले ज्यामुळे राज्यांनाही दिलासा मिळाला आहे आणि तेथील अर्थव्यवस्था सुधारण्याचे कामही प्रगतीपथावर आहे. त्या म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वावलंबनाची प्रतिज्ञा घेतली आहे, म्हणून सरकार हा संकल्प पूर्ण करण्यासाठी काम करत आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -