घरदेश-विदेशकाँग्रेस नेते अभिषेक मनु सिंघवी कोरोना पॉझिटिव्ह

काँग्रेस नेते अभिषेक मनु सिंघवी कोरोना पॉझिटिव्ह

Subscribe

कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर सिंघवी यांनी स्वतःला घरीच क्वारंटाईन केले आहे

भारतातील कोरोना कहर सातत्याने वाढत आहे. आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि वकील अभिषेक मनु सिंघवी यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. एका अहवालानुसार सिंघवी यांच्यात कोरोनाची सौम्य लक्षणे दिसत आहेत. कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर सिंघवी यांनी स्वतःला घरीच क्वारंटाईन केले असून ते आता १४ दिवस आयसोलेशनमध्ये राहणार असल्याचे सांगितले जात आहे.

वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, सिंघवी यांना ताप आला होता. त्यांची कोरोना तपासणी केली असता त्यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. यासंदर्भात करण्यात आलेल्या चौकशीत त्याच्या पत्नीलादेखील कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे.

- Advertisement -

सिंघवी यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांचा मुलगा, कुटुंबातील इतर सदस्य आणि त्यांच्यासोबत काम करणारे कर्मचारी यांची तपासणी सध्या सुरु आहे. कोरोनाचा संसर्ग झालेल्या कॉंग्रेसचे हे दुसरे नेते आहेत. यापूर्वी कॉंग्रेस नेते संजय झा यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते.

सिंघवी यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना ९ जुलैपर्यंत घरातच आयसोलेशनमध्ये राहण्यास सांगण्यात आले आहे. यापूर्वी भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनाही कोरोना विषाणूची लागण झाली होती. काही दिवस रूग्णालयात राहिल्यानंतर त्याचा अहवाल निगेटिव्ह आल्यावर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. भाजपा नेते ज्योतिरादित्य सिंधिया आणि त्यांच्या आईलाही कोरोना विषाणूची लागण झाली असल्याचे सांगण्यात आले आहे.


दिल्लीच्या आरोग्यमंत्र्याचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह; आज मिळणार डिस्चार्ज
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -