घरताज्या घडामोडीकाँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांच्या पुतण्याचा भाजपमध्ये प्रवेश, पंतप्रधानांबाबत केलं मोठं...

काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांच्या पुतण्याचा भाजपमध्ये प्रवेश, पंतप्रधानांबाबत केलं मोठं वक्तव्य

Subscribe

गुलाम नबी आझाग त्या काँग्रेस नेत्यांच्या गटात होते ज्यांनी ऑगस्ट २०२० मध्ये काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्राद्वारे संघटनात्मक बदल करण्याच्या सूचना केल्या होत्या.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांचा पुतण्या मुबश्शिर आझादने रविवारी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जमिनी स्तरावर केलेल्या कार्यामुळे प्रभावित झाल्याने भाजपमध्ये प्रवेश केला असल्याचे मुबश्शिर म्हणाले आहेत. गुलाम नबी आझाद यांचे सगळ्यात छोटे बंधू लियाकत अली यांचा मुलगा मुबश्शिर आझाद आहेत. काँग्रेसच्या नेतृत्वाने त्यांच्या काकांचा अपमान केला. याचे दुःख झाल्याने काँग्रेसशी संबंध तोडला असल्याचे मुबश्शिर यांनी म्हटलं आहे.

भाजपमध्ये प्रवेश करण्याबाबत आपल्या काकांशी म्हणजेच गुलाम नबी आझाद यांच्याशी चर्चा केली नाही असे मुबश्शीर यांनी स्पष्ट कंले आहे. मुबश्शिर आझाद आणि त्यांच्या समर्थकांचे भाजप जम्मू काश्मीर युनिटचे अध्यक्ष रविंदर रैना आणि माजी आमदार दलीप सिंह यांच्या परिवारासह त्यांचे पक्षात स्वागत केलं आहे.

- Advertisement -

आझाद यांच्या भावाने 2009 मध्ये केला होता भाजप प्रवेश

एप्रिल 2009 मध्ये आझाद यांचे भाऊ गुलाम अली यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपचे रविंदर रैना यांनी सांगितले की, भाजपमध्ये प्रवेश हा चिनाब खोऱ्यातील डोडा, किश्तवार आणि रामबन जिल्ह्यातील तरुण कार्यकर्त्यांसाठी “निर्णायक टर्निंग पॉइंट” आहे. “भाजप विरोधी पक्षांचे राजकीय नेते, हिंदू, मुस्लिम, गुज्जर, बकरवाल आणि पहारी अशा सर्व समाजातील सामाजिक कार्यकर्त्यांना सोबत घेऊन वेगाने पुढे जात आहे.”

- Advertisement -

मुबश्शीर आझाद म्हणाले, काँग्रेस पक्ष भांडणामध्ये गुंतला आहे. तर मोदींच्या नेतृत्वाखाली लोकांच्या कल्याणाची कामे करण्यात येत आहे. काँग्रेसचे नेतृत्व माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांच्याशी ज्या प्रकारचे वर्तन केलंय त्यामुळे लोकांच्या भावना दुखावल्या आहेत. तसेच मुबश्शिर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आझाद यांचे कौतुक केलं परंतु काँग्रेस पक्षाने त्यांना बाजूला केले. दरम्यान गुलाम नबी आझाग त्या काँग्रेस नेत्यांच्या गटात होते ज्यांनी ऑगस्ट २०२० मध्ये काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्राद्वारे संघटनात्मक बदल करण्याच्या सूचना केल्या होत्या.


हेही वाचा : तुमचा राजा जिवंत पाहिजे असेल तर…, संभाजीराजेंचा मराठा आरक्षणावरुन इशारा

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -