घरमहाराष्ट्र'त्या' सगळ्याच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी आत्मचिंतन करावं, अजित पवारांचा सल्ला

‘त्या’ सगळ्याच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी आत्मचिंतन करावं, अजित पवारांचा सल्ला

Subscribe

ही आपली पद्धत नाही, महाराष्ट्राची निर्मिती होऊन 60 वर्षांचा काळ लोटलाय. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा, वसंतराव नाईक, शरदराव पवार या सगळ्यांच्या काळामध्ये कशी एक पद्धत होती. विलासराव देशमुखांच्या मंत्रिमंडळातही 8 वर्षे काम केले. तेव्हा गोपीनाथराव मुंडे विरोधी पक्षात होते.

मुंबईः जे चुकीचं बोलतायत त्या सगळ्याच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी आत्मचिंतन आणि आत्मपरीक्षण केलं पाहिजे. त्यात सुधारणा केली पाहिजे, असंही राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणालेत. अजित पवारांनी आज प्रसार माध्यमांशी संवाद साधलाय, त्यावेळी ते बोलत होते.

ही आपली पद्धत नाही, महाराष्ट्राची निर्मिती होऊन 60 वर्षांचा काळ लोटलाय. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा, वसंतराव नाईक, शरदराव पवार या सगळ्यांच्या काळामध्ये कशी एक पद्धत होती. विलासराव देशमुखांच्या मंत्रिमंडळातही 8 वर्षे काम केले. तेव्हा गोपीनाथराव मुंडे विरोधी पक्षात होते. सत्ताधारी पक्षाचे नेते म्हणून विलासराव होते, पण एवढ्या खालच्या पातळीवर कधी गेले नव्हते, त्यांची भाषणं तुम्ही पाहिली असतीलच, असंही अजित पवार म्हणालेत. एकमेकांना चिमटे काढायचं काम व्हायचं. तसेच पवार आणि बाळासाहेबांमध्येही एकमेकांवर टीकाटिपण्णी व्हायची. पण तरीदेखील त्यांचे मित्रत्वाचे संबंध आम्ही शेवटपर्यंत बघितले. तसं मात्र आताच्या काळामध्ये दिसत नाही, असंही अजित पवारांनी अधोरेखित केलंय.

- Advertisement -

50 टक्क्यांच्या पुढे आरक्षण देताच येत नाही- अजित पवार

संभाजीराजेंच्या उपोषणावर ते म्हणाले, त्यांना मी शिवजयंती दिवशीच आवाहन केलेलं होतं. जे काही मुद्दे राज्य सरकारच्या अखत्यारीत असतील, ते आपण त्यात सोडू या, मात्र जे राज्याच्या अखत्यारीतमध्ये नसतील ते सोडवणं अवघड आहे. कारण काही मुद्दे केंद्र सरकारशी संबंधित आहेत. 50 टक्क्यांच्या पुढे आरक्षण देताच येत नाही, असं सुप्रीम कोर्टानं स्पष्ट सांगितलेलं आहे, असंही त्यांनी सांगितले.

संभाजी राजेंनी उपोषण सोडावं, अजितदादांचं आवाहन

50 टक्क्यांच्या आरक्षणाची अट काढायची म्हटल्यास केंद्र सरकार संसदेत तसं विधेयक आणूनच काढू शकते. त्यांनी उपोषणाला बसू नये, असं वाटत होते. दोन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंनी एक बैठक आयोजित केली होती, त्या बैठकीला मी होतो. अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, दिलीप वळसे पाटील, सर्व अधिकारी वर्ग होता. त्या बैठकीत अनेक विषयांवर चर्चा झाली. अशी कामं गतीनं मार्गी लावयला पाहिजेत. संभाजी राजेंनी उपोषण सोडावं यासाठी काही जणांकडे जबाबदारी दिलेली आहे. काल काही जण गेलेले होते, आज पण काही जण जाणार आहे, अशी माहिती आहे, असंही अजित पवार म्हणालेत.

- Advertisement -

हेही वाचाः भारताने स्वत:ची सैन्यक्षमता अन् युद्ध सामुग्रीचे आधुनिकीकरण यांवर भर द्यायला हवा- निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -