घरमहाराष्ट्रमराठी भाषा गौरव दिनी मनसेची मोठी घोषणा; अमित ठाकरेंवर सोपवली 'विद्यार्थी सेने'ची...

मराठी भाषा गौरव दिनी मनसेची मोठी घोषणा; अमित ठाकरेंवर सोपवली ‘विद्यार्थी सेने’ची जबाबदारी

Subscribe

आज ‘मराठी राजभाषा गौरव दिना’दिवशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मोठी घोषणा केली आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांच्यावर पक्षाने मोठी जबाबदारी सोपवली आहे. अमित ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षपदी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मनसेने अधिकृत परिपत्रक काढून ही महिती दिली आहे. तसेच त्यांचे अभिनंदन देखील केले आहे. दरम्यान आगामी महापालिकेच्या निवडणुकींच्या दृष्टीने अमित ठाकरे यांच्यावर सोपवलेली जबाबदारी महत्त्वाची मानली जात आहे. राज ठाकरे यांनीही आपल्या कारकिर्दीची सुरुवात शिवसेनेच्या अखिल भारतीय विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून केली होती. यानंतर मनसे नावाचा स्वतंत्र पक्ष सुरु करत त्यांनी राजकारणात राज ठाकरे नावाचं कणखर नेतृत्त्व निर्माण केलं. त्यामुळे राज ठाकरे अल्पावधीत लोकप्रिया झाले. त्यामुळे आता त्यांचे सुपूत्र अमित ठाकरे काय किमया साधतात, हे पाहावे लागेल.

अमित ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षपदी निवड
अमित ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षपदी निवड

अमित ठाकरे गेल्या काही महिन्यांपासून राजकारण विशेष सक्रिय दिसत आहेत. मनसेच्या मुंबई, नाशिकसह अनेक जिल्ह्यांत आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या बैठकांमध्ये, सभांमध्ये त्यांची उपस्थिती दिसते‌. मात्र पक्षाकडून त्यांच्यावर कुठलीही जबाबदारी सोपवण्यात आली नव्हती. दरम्यान मुंबईतील अनेक मनसे पक्षांच्या शाखांमध्ये त्यांनी स्वत: भेट देत कार्यकर्त्यांशी संवाद साधला आहे. मात्र आता महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने अमित ठाकरे यांची जबाबदारी आणखी वाढली आहे. मात्र अमित ठाकरे यांना स्वत:ला सिद्ध करण्यासाठी मिळालेल्या या नव्या व्यासपीठाचा कसा वापर करता हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

- Advertisement -

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -