घरताज्या घडामोडीखासदारकी गमावल्यानंतर राहुल गांधी पहिल्यांदाच वायनाडमध्ये, बहिणीसोबत केला रोड शो

खासदारकी गमावल्यानंतर राहुल गांधी पहिल्यांदाच वायनाडमध्ये, बहिणीसोबत केला रोड शो

Subscribe

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच वायनाडमध्ये उपस्थिती लावली होती. यावेळी त्यांनी जनतेला संबोधित करत काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्यासोबत राहुल गांधी यांनी रोड शो काढला होता. या रोड शोला काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लावली होती. राहुल गांधींनी जनतेला संबोधित करत केंद्र सरकारवर निशाणा साधला.

खासदार म्हणजे फक्त एक टॅग किंवा पोस्ट आहे. भाजप माझ्याकडून टॅग, पोस्ट आणि माझं घर हिरावून घेऊ शकते. तसेच मला तुरुंगातही पाठवू शकते. परंतु ते मला वायनाडच्या लोकांचं प्रतिनिधित्व करण्यापासून रोखू शकत नाहीत. त्यांना वाटतंय की, ते माझ्या घरी पोलीस बोलावून मला घाबरवण्याचा प्रयत्न करतील. मला आनंद वाटतोय की, त्यांनी माझं घर घेतलं. कारण त्या घरात राहून मी समाधानी कधीच नव्हतो, असं म्हणत राहुल गांधींनी भाजपवर निशाणा साधला.

- Advertisement -

ते माझा संघर्ष समजून घेऊ शकले नाहीत. त्यांना आश्चर्य वाटते की, त्यांचे विरोधक का घाबरत नाहीत. त्यांना पोलिसांची भीती वाटत नाही, असंही राहुल गांधी म्हणाले.

- Advertisement -

प्रियांका गांधींचा पंतप्रधान मोदींवर निशाणा

काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. राहुल गांधींनी अदानींबाबत जे प्रश्न विचारले त्यानंतर त्यांना अपात्र ठरवण्यात आलं. ज्याचे उत्तर भाजप अद्यापही देऊ शकले नाही. भाजप लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम करत आहे. पंतप्रधान मोदी दररोज आपली ड्रेसिंग स्टाईल बदलत आहेत, परंतु सर्वसामान्यांच्या जीवनशैलीत कोणताही बदल झालेला नाही. ते नोकरीसाठी संघर्ष करत आहेत, असं प्रियांका गांधी म्हणाल्या.


हेही वाचा : पायलट यांच्या उपोषणाला पक्षश्रेष्ठींचा विरोध, बॅनरवरून काँग्रेस नेत्यांचे फोटो गायब


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -